प्रीत माझी..
मी अंगण
त्यातली तुळस तू..
मी काटेरी बाभूळ
प्राजक्ताचं फुल तू..
टणक नारळ मी
रसाळ गोड पाणी तू..
उनाड मी वारा
मनमोहक धुंद गारवा तू..
बोडखा मी डोंगर
त्यातली रम्य वनराई तू..
दगड मी देवळाचा
गाभाऱ्यातली मूर्ती तू...
दिवा मी अंधारातला
संथ जळणारी वात तू...
आभाळाची पोकळी मी
लुकलूकणारी चांदणी तू..
तुटणारा तारा मी
ओंजळीत झेलणार तू....
विझलो जरी मी
संथ जळणारी वात तू....
संथ जळणारी वात तू....
संजय सावळे