Get it on Google Play
Download on the App Store

सरडा...

पडला होता सडा फुलांचा
दारात उभा पारिजातक वेगळा,
मलाच मी ओळखीत नव्हतो
होता चेहरा धुळीने माखलेला...

अपमान अन दारिद्र्याच्या
जन्मापासून सोसल्यात झळा,
अंगणात खूप दंश झाले
प्रत्येक वेळी माणूस वेगळा...

खूप माणसं बघितली येथे
रंग बदलणारी क्षणाला,
सरडाही ओळखू शकला नाही
आपल्याच कुंपणाला....

दाणे खूप काही टाकले
थवा कधीच उडाला,
सोडून रात्र चांदण्याची
चंद्र कधीच बुडाला...

हसता-हसता रडलो मी
अश्रू ओंजळीत आला,
झोळी झाली ओली
पण गंध नव्हता वळीवाला...

संजय सावळे