Get it on Google Play
Download on the App Store

अंतर वाढत जाते.....!!

आशवस्थ आशांची पूर्ती हाच रम्म सोहळा जगण्याचा
आशिर्वाद तव ईशाचा पूर्णत्व लाभो इच्छांना  .....!!!

गेली अनेक वर्षे धावत होते मला माझ्या साठी असे कधी काही करायला जमलेच नाही अगदी स्वतः च्या स्वार्थ ही...नंतर नंतर करत अंतर वाढत गेले आजचाच विचार आला.....बघा ना

आत्ताच दिवस सुरू झाला...
आणि बघता बघता संध्याकाळ सुघ्दा होण्यास आली ......
शनिवार आलासुद्धा.  
अधिकमास सुरु झाला
..वर्ष संपायला आले,
... वयाची  ५०वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही.

आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही ...
आपल्या आयुष्यात रंग भरायचे काम मला सगळ्यांना सांभाळत  जमेल तसे करत आहेच
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेत तर इथपर्यत आले कुणाच्या ही आधाराशिवाय  ...कितीनी नाके मुरडली बाजूला केले आपले आपले बघून घेतले कुष्ठरोग झाल्यासारखे....  पण
हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करत करत एवढे अंतर पार झाले खरे ....ताकद मिळत गेली
पुढचे .....नंतर नंतर म्हणत अंतर वाढत जाते अन् वेळही...
 मग समजावले स्वतःलाच ..आत्ता च आज ताबडतोब...
उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे तर मग कुठलीही कृती पुढे नको
... हे नंतर करीन,
... हे नंतर सांगीन,
... यावर नंतर विचार करीन,
'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे?

कुणाला काही वाटो....
   
वयाने लहान म्हणून सगळे सहन करत जातो आपण आपल्या काही न केलेल्या चुकांची शिक्षा इतरांच्या majorityसाठी सोसत जातो  पण तो मोठ्यांचा ठेवलेला सन्मान असतो ..ते समजतील नंतर असे म्हणत अंतर वाढत जाते अन् माणसे आपला स्वार्थ साधून आनंद लुटतात ....दुसऱ्या च्या तोंडचा आनंद ओरबाडून गिधाडासारखी... आपलाच
मनोरा वापरुन  .....!!!!!

नंतर नंतर म्हणत अंतर वाढत जाते ....

तुम्ही आहात कि नाही ही या  जाणीवेच्या कक्षेतूनच तुम्ही हद्दपार झालेले असता तुमचे नावही त्यांना मिठासारखे खारटच वाटते  ऋणानुबंध कसले...खोटा फार्स.!!
आता खोटी  आनंदी तोंडे सल्ले विचारपूस सगळेच खोटे खोटारडे सुखी चेहरे नकोच ते ..
पण
नंतर नंतर अंतर वाढत जाते मन मोकळे करा...

काहींजणींनी खूप चेष्टा केली मजा घेतली पण   हसण्याची संधी देवून तुमचेच आयुष्य त्याच्या आनंदासाठी उपयोगी पडले हे तुमचे पुण्य....हे संचित हा त्याग आज उपयोगी येईल..च..!!

नंतर नंतर अंतर वाढत वाढत ..आपणच संपून ....??म्हणून नंतर नको आत्ता च कुणाला वाईट वाटेल म्हणून गप्प राहू नका हाच बोध आजचा तुम्हाला काय हवयं याचा विचार आत्ता च करा.....नंतर अंतर वाढत जाते...

आपण हे समजून घेत नाही की...
प्राधान्य बदलल्यानंतर ...
उत्साह निघून गेल्यानंतर...
आरोग्य बिघडल्यानंतर ...
मुले वयात आल्यानंतर ...
आई-वडील म्हातारे झाल्यानंतर ...  
..
दिवसाची रात्र झाल्यानंतर ...
आयुष्य संपल्यानंतर ...
...आपल्याला कळते,
...अरे बापरे...
उशीर झाला की ...  

म्हणूनच 'नंतर' काही ठेवू नका.

'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी, चांगले क्षण हातातून निसटून जातात.

दिवस आजचा ...
आणि क्षण आत्ताचा ...

आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणारे नाही ही जाणीव मनातली उणीव भरुन काढेल अध्यात्मिक शक्ती वाढवा स्वतः तील स्वःला केंद्रित करुन आत्मबल आत्ता च वाढवायला हवे नंतर नंतर अंतर .....!!
 
नकारात्मक तरी सकारात्मकताच दाखवण्याचा प्रयत्न ...
व्यक्त व्हा वेळीच नंतर खूप उशीर ..आनंदी राहा आरोग्य दायी राहा ..!!

©मधुरा धायगुडे