Get it on Google Play
Download on the App Store

मानसिक आहार...आनंदाचे prescription

ही कन्सेप्ट जरा नविन आहे,
पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे
"तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो"  मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे का?बघू या.
मी बोलतीये ते एका चविष्ट आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या आहाराझाझबद्दल..

स्वत:च अवघं आयुष्य बदलुन टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते.
मग त्यांना चांगलं निकोप ठेवायची जबाबदारी आपलीचं असते.
तर मानसिक आहार म्हणजे काय करायचं
तरं आपले विचार आधिकाधिक पारदर्शक  कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा,

तेलकट-तुपकट म्हणजे -निगेटिव्ह विचार आपण करणार नाही,

अती-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात इतरांच्या संवेदना दुखावाल्या जावूनआपल्याकडून अपमान होणार नाही असे विचार आपण जवळ येऊ देणार नाही.
प्रत्येकाला खुश ठेवणे कुणालाच शक्य नाही म्हणून कुणी टीका केली तर मनाला लावून घ्यायचे नाही मात्र दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देवून खुश करु शकतो. दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकुन देऊ,

आठवड्यातुन एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ
आपल्यापेक्षा अधिक दुर्दैवी दुःखी लोकांना मदत करता येईल.,,
या अशा मुल्यशिक्षणा बरोबरंच महत्वाचं आहे ते स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरकं ओळखुन स्वत:ला "रीझनेबल" बनवणं,
दुसर्‍यांच्या मतांना आदर देणं,
दुसर्‍यांना वेळ देणं, संवाद चालु ठेवणं,
मनाचं वातावरण नेहमी हलकं फुलकं ठेवणं,
एकमेकांच्या अस्तित्वाची जाणिव ठेवणं
आणि बरंच काही.

या सगळ्यातला समतोल हरवला ना की आपल्या नात्यांना अपंगत्व येणारंच आणि मग नीट डायग्नोसीसंच झालं नाही म्हणुन मनाला कायमची बेडरेस्ट पण मिळु शकते.

माणुस आहे,
मनं पण थकतं हो कधीकधी,
त्याला इंस्टंट एनर्जी मिळते ती फक्त एक कप विश्वासाच्या चहाने,
वाह ताज !!!

सगळ्यात महत्वाचं कि आपल्या या मानसिक आहाराचे चे साईड इफेक्ट्स खुप मस्त असतातं.

लोकं प्रेमात पण पडु शकतात तुमच्या.
तुमच्या चेहर्‍या वरचा ताण कमी होतो,
तुम्ही यंग वाटू लागता, टेंन्शन कमी होतात,
वास्तविक, मन ओके असेल
तरचं लाईफ ओके असतं, नाही कां?

असं हे व्रत च म्हणूयात हे आजच्या जीवनशैली मधे एक संजीवनी देईल हे नक्की.

साध्या आणि ताज्या विचारांच सॅलड आपली नक्की काळजी घेईल.

शाकाहारी विचार आयुष्य वाढवतील
बदल हा नेहमीच चांगला असतो.

असा मानसिक आहार एकदा करुन बघायला काय हरकतं आहे ना ? त्यासाठी त्याची मानसिक तयारी हवी छोट्या गोष्टीत आनंद शोधायला हवा....
आनंदाचे हे prescription आवडले ना!!!!

©मधुरा धायगुडे