काटकसर
सरते वर्ष करोनाचेच... काय शिकवलं तर हो " काटकसरच" शिकवली ..... कारण माझा स्वभावच मुळात काटकसरी .....उधळपट्टी हा माझा काय कोणत्याही स्त्री चा च स्वभाव नाही..........अर्थात प्राप्त परिस्थितीत स्वतः ला बदलत राहणं हा मनुष्यस्वभाव तसेच मी ही करतेय आता आपण सगळे तेच करतोय सध्या यातून मिळालेला हा धडा ...
काटकसरी च्या नावाखाली मन मारून जगणाऱ्या ना हे फारसे नवीन नाही ..... घरात कामवाली न लावता ते पैसे वाचविणे..... स्वतःची गाडी असताना..." नको बाबा किती पेट्रोल वर पैसे उधळायचे.... "म्हणून त्रास सहन करणे...... इस्त्रीवाली ला का पैसे द्यायचे म्हणून स्वतःच तासनतास ते करत बसणे...... यासारख्या कितीतरी गोष्टी काही स्त्रिया करत असतील.... ज्याला महत्व तर आहेच पण तुमच्या जीवापेक्षा ती काटकसर नक्कीच जास्त नाही....हे ही कळतेय पण त्या सरावाचा आत्ता उपयोग होतोय का हो ? परवाच एका पोस्ट मधे मी वाचलं मुलांसाठी एवढच कमवुन किंवा साठवुन ठेवा कि ते परावलंबी होणार नाहीत.... आणि ते बरोबर ही आहे.... मग एवढा काटकसरीचा अट्टहास कशासाठी....? हं वेगवेगळ्या मेडिकल पाॅलिसी..... थोडफार सोनं...... एखाद छोटस घर.... झाल ना कि बस्स असाच शिरस्ता जनमानसात रुढ आहे पण हा कोरोना आता जगण्याचे मापदंड ही बदलायला लावतोय का .?..या महामारीशी लढण्यासाठीची तरतूद ही करावी लागेल त्यानुसारच मुलांना वाढवावे लागेल का ? सज्ज व्हा तुम्हाला लढायचेय असे म्हणून ....सहज विचार आला
पूर्वी चे मापदंड...... हे सुंदर जग बघावं.... पुस्तकांचा खजिना पाहिजे तेवढा वाढवावा... आणि काटकसर करून वाचवावा तो वेळ....... स्वतःसाठी........ स्वतःतच्या आरोग्यासाठाी........ ज्ञानार्जनासाठी........ दिवसभर काम सगळे घरी करून जर स्वतः साठी वेळ नसेल तर बाई न लावता वाचवलेल्या पैश्यांचा उपयोग काय? पण आता अशा संकटांना सामोरे जाण्याची ही संथाच योग्य निवड च म्हणावी लागेल...
स्त्रियांनी तर चाळीशी नंतर आता पन्नाशी म्हटले तरी चालेल फक्त काटकसर करावी ती वेळेची... आणि जपावं ते आरोग्य आणि मानसिक आरोग्यासाठी छंद..... वयाच्या या टप्प्यावर येणारा एकाकीपणा, निरनिराळे मानसिक आजार हे... वेळेत काटकसर न केल्याचेच संकेत आहेत....... आवडीची साडी घ्या... आवडतं ते खा..... आवडतं ते वाचा..... छानसे सिनेमे बघा......पण आता हे ही बदलावे लागेल बहुधा . शेवटी आपल्यालाही एकच मानवी जन्म मिळणार आहे...... तेव्हा उधळपट्टी न करता........... पैसा किती अमुल्य आहे... याची जाण ठेवुन...... जगावे लागेल पुढील पिढीला संस्कार देताना आता अशा संकटाचा सामना करण्याचे बळ ही द्यावे लागेल का ? असा विचार आला ......
.शेवटी .." सर सलामत तो पगडी पचास."... तसं आपण आहोत तोवरच जग आहे.......तेव्हा लढूयात" काटकसर" हा पुन्हा नव्याने करोनाने दिलेला हा धडा आनंदाने स्वीकारत पुढे जायचे .पैसे पैसे पैसे जमवत काटकसर करत सधन होता येते च बघा खालचा हा पैशांचा फोटो बघितला तरी श्रीमंत होण्याचे फील येईल काटकसरीचे शल्य न वाटता अभिमानच वाटतो स्वतः च स्वतःला.... केवळ मनीचे समाधान नाही हे ...!!!
काटकसर करता करता श्रीमंत होता येते ..मनाची सधनता असेल तर धनाचीही सधनता अनभुवता येतेच....
अर्थात हे माझे मत...
व्यक्ती सापेक्षता आहेच
©मधुरा धायगुडे