9. हाउस ऑफ कार्डस्
हाउस ऑफ कार्डस् हे पुस्तक खेड्यातील साधे जीवन आणि शहरातील गुंतागुंतीचे जीवन यातील तफावत दाखवते. एका खेड्यातील मृदुला नावाच्या मुलीची ही कथा आहे. लग्नानंतर तिच्या आयुष्यात झालेल्या बदलांची ही कथा आहे. लग्नानंतर मृदुला बेंगलोर मध्ये तिच्या डॉक्टर पती बरोबर रहाते आणि तिथे ते चांगले नाव कमावतात. नंतर त्यांच्यात वाद वाढतात. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक नात्याला कलाटणी मिळते. आपण हे पुस्तक वाचत असताना यातील जवळ जवळ सर्व घटनांची आपल्या आयुष्यात घडणार्या प्रसंगांशी तुलना केल्याशिवाय राहणार नाही.