3. जेन्टली फॉल्स द बकुला
जेन्टली फॉल्स द बकुला ही श्रीकांत आणि श्रीमती या प्रेमी युगुलाची कथा आहे. ते दोघे दोन वेगवेगळ्या शत्रूवत समाजातील असून त्यांचे एकमेकांवर प्रेम जडते. या पुस्तकाचे वैशिट्य म्हणजे यातील व्यक्तिचित्रण होय. सुधा मूर्ती यांचे लेखन थेट वास्तवाशी हातमिळवणी करणारे आहे, या पुस्तकातील घटना आपण आपल्या घरांमध्ये किंवा शेजारी पाजारी पहिल्या असतील हे निश्चित! कथा साधी सोपी आहे. हे कथानक मुख्यत्वे त्यामधील दोन मुख्य पात्रांच्या आयुष्या भोवती फिरते. या कथानकाच्या माध्यमातून सुधा मूर्ती हुबळी सारख्या लहान शहरातील समाजाच्या व्यक्तीच्या प्रश्नावर अचूक बोट ठेवतात.