1. वाईज एंड अदरवाईज
वाईज एंड अदरवाईज हे एक वास्तवदर्शी पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे सुधा मूर्ती यांच्या आयुष्यात आलेल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या सामान्य व्यक्तींचे शब्दचित्रण आहे. या व्यक्ती त्यांना त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात वेगवेगळ्या वळणांवर भेटत गेल्या आणि त्यांनी त्यांच्या मनावर विशेष छाप सोडली. त्या व्यक्तींची शब्दचित्रे प्रचंड बोलकी आहेत.