त्याला पश्चात्ताप सुद्धा झाला नाही
विक्रमार्क वडाच्या झाडाजवळ गेला. शब खाली उतखून खांद्यावर टाकले आणि स्मशानाच्या वाटेला लागला. आपल्या संबधी- प्रमाणे शवांतील वेताळ बोलू लागला. म्हणाला-" मला वाटते, या कामाची जबाबदारी शिरावर घेतल्यामुळे तुला आता पश्चाताप वाटत असेल नाहीं! पश्चात्ताप न करणारा त्या काश्मीरपर्मा सारखा कोणी बिरलाच मिळायचा. त्याचीहि गोष्ट ऐकून ठेव." त्याने गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला. एकदांकपिल देशांत काश्मीरवर्मा नांवाचा एक तरुण राहात होता. तो चांगला सुशिक्षित होता. पण अतिशय गरीब होता. स्था वेळी पंडितांचा आदर करणारा कोणी हरीचा लाल नसल्यामुळे या पंडिताची ती दशा झाली होती. ल्याने आपल्या पांडिल्याचा उपयोग करून चांगुलपणाने पैसे मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पोटापुरते पैसे सुद्धा मिळू शकले नाहीत. तेव्हा कोजत्यादिरीतीने पैसे मिळावे असे त्याने ठरविलें. तो चोरीमारी, किंवा जुगारीने पैसे मिळy अगला. कुक- डाच्या मिळकतीचा उपयोग हि ज्या प्रमाणे व्हायचा त्याच प्रमाणे होऊ लागला. तो नशेबाज आणि रंगेक बनला. ज्यांना याचे पांडित्व माहीत होते ते बाला नर्षि टेबीत. पण बाने की त्या लोकांची पर्वा केली नाही. थंडीचे दिवस होते. स्मशानाजवळील झोपडीत काही चोर जमले होते. तेथे ते खूप शिगून पडले होते. जे अर्धवट गुंगीत होते. त्यांनी जुगार खेळण्यास प्रारंभ केला. काश्मीरबर्मा पण तेच होता. खेळतां खेळतां त्यांतील दोघांचे भांडण झालें. त्यांतील एक जण सारसा जिंकत पालका होता. हणून दुसऱ्याला राग आला. त्यांत जिंकणारा कुचेष्टेने दुसन्याला हंसला. म्हणून तो जास्तच चिडला आणि खाने त्याच्या पोटांत एकदम सुरी सुसपली. त्याबरोबर तो तेवत्या तेथें मरून पडला. सर्व पोरांनी तेथून पाय काढला. त्यावेळी त्यांनी अंडीबायाची परवा केली नाही आणि सर्व आपापल्या घरी गेले. काश्मीरवर्मा मात्र त्या प्रेताजवळच बसून राहिला. प्रेताजवळ बसून तो विचार करूं लागला. हल्या म्हटली की त्याच्यासाठी कोणी तरी कांसावर पदणारच. बा प्रेताजवळ जर मी सांपडलो तर मलाच कदाचित ते शासन मिळेल." त्याच्या अंगाचा थरकांच झाला आणि दरदरून घाम सुटला. आता येथे राहातां उपयोगी नाही. असा विचार येतांच तो झोपडीच्या बाहेर आय आणि शहराच्या दिशेने वाट चावं लागला. कोठे तरी एकाचा पराच्या पडवीत किंवा रस्त्या-वरील ओव्यावर रात्रभर पडून राहावे असा त्याने विचार केला. बात कोठे गस्त पालगारे पोलीस दिसले की तो पराच्या आडोशाला लपत होता. काश्मीरवर्ना शेवटी आपल्या एका जुन्या मित्राच्या घरी येऊन पोहोचला व त्याने त्याचे दार ठोठावले. "कोण आहे !" आनून आवाज आला. "मी काश्मीरवर्मा. जरा दार उघड, मी पाहाटेपर्यंत येथेंच विवाति घेऊन लगेच निघून जाणार आहे." काश्मीरवर्मा म्हणाला. बराच वेळ झाला आतून काही उत्तर मिळाले नाही. तेथून तो थोड्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या एका मित्राकडे गेला. तेथेंहि त्याचे नांव ऐकल्यावर त्याला दार उघडले नाही. आपल्याला कोणी दार न उघडलेलें पाहून त्याच्या मनांत सम्हेत-हेचे विचार आले, "नीच आहेत ही माणसे. ही मोठ- मोठी घरे काय मेल्यावर आपल्या बरोबर का घेऊन जाणार आहेत ! थंडीने मरणाराला थोडा वेळ तरी आश्रय यायला काय हरकत आहे। उपाशी मरणारा पांसभर अन्न नाही की गरजवंताला मदत नाही. काय करावयाची आहे एवढी मोठी दौलत जमवून." चंडीत कुडकुडत विचार करीत तो चालला होता. स्याने थंडीच्या दिवसांत परादारांशिवाय रस्त्यावर राहणाऱ्या पोराबाळांना मरतांना पाहिले होते. ती आठवण होऊन त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याला वाटलें, आपल्याला सुद्धा आज तसेच मरावें लागणार. तसे मरण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याला उपाय म्हणून चोराप्रमाणे एकाचा परांत घुसण्याचा विचार त्याच्या मनांत आला. समोरच एक मोठा वाडा स्याला दिसला. त्या वाड्यांतील स्वयंपाक घरांत शिरण्याचा त्याने विचार केला. म्हणजे तेथे काही तरी खायलाहि मिळेल, उप पण असेल. तेथेच रात्र काढावी आणि पाहाटे चार चांदीची भांडी घेऊन पसार व्हावे. आंत शिरण्यासाठी बाब्याच्या भोवती फिरून त्याने पाहिले. पण आश्चर्य, त्याला आंत लख्ख प्रकाश दिसला. म्हणून त्याने आपला बेत बदलला. चोरा- प्रमाणे जाण्यापेक्षा सरळ जायें असे त्याला बाटले. त्याने दार ठोठावले. आंतून एक रुबाबदार आणि थोडा बयस्क माणूस आला. त्याने दार उघडले आणि त्याला पाहून म्हणाला-"आत्तां दार ठोठावून येण्याची काय गरज!" "महाराज, चंडीने आणि भुकेने प्राण अगदी कंठाशी आले आहेत.” तो म्हणाला. 'ये आंत." असे म्हणून तो माणूस त्याला घेऊन स्वयंपाक घरांत आला. घरांत त्याच्या शिवाय कोणीहि नसल्याने त्यानेच त्याला बाढले. जेवत असतां त्याने चारी बाजूला नजर फिरवली. एका मोठ्या कपाटांत बरीचशी चांदीची भांडी त्याला दिसली. तो मनांत म्हणाला-" यांतील एकादें भांडे जरी उचलत नेलें तरी पुरे." काश्मीर वर्मा जेवत असतां पर मालकानें स्थाला विचारले. म्हनाला-"बाबा, तुझ्या कपल्यावर हे रकाचे डाग कसे।" "ते काम माझे नव्हे. चोरांचोरांत मारा- मारी झाली. त्यांत एक जण मारला गेला. स्या प्रेताची कल्पना आली तरी भीति वाटते." काश्मीर वर्मा म्हणाला. "सा प्रेत पाहिले की तुला भीति वाटते! मी पुष्कळ प्रेते पाहिली आहेत. मी किती तरी लढाया लवलो आहे, माझे नांव जगवीर. ऐकले असशील कदाचित माझें नांब ! चरं, पण तू कोण?" त्याने विचारलें. " माझं नांव काश्मीर वर्मा. मी व्याकरण, तर्क आणि कायदा या तिन्ही विषयांचा पंडित, म्हणजे पदवीधर आहे आणि चोरी करुन पोट भरणे हा माझा धंदा आहे." वर्मान सांगितले. 'असा सुशिक्षित असून चोरीचा पैदा करतोस?" मालकानें आधर्याने विचारले. मग त्यात काय झालें. तुम्ही नाही का योथ्यांना मारतां, लुटतां !" काश्मीर- वनि विचारले. “योद्धा आणि चोर बांची बरोबरी कशी होईल. योद्धा आपल्या देशासाठी, थर्मासाठी, प्रतिष्ठेसाठी आपले पाण तळहातावर घेऊन लवतो आणि चोर फक्त आपल्या स्वार्था- साठीच चोरी करतो." जगवीरवर्मा म्हणाला, “चोरांना सुद्धा आपल्या प्राणाचे भय असतेच. योद्धे एक दुसम्याला मारतात. चोरांना तसे दुसऱ्याला मारता येत नाही. त्याच्या अगोदरच त्यांना फासावर चढवलें जाते." काश्मीरवर्मा म्हणाला. सैगिक प्रजेचे रक्षण करतात. चोर प्रजेचे नुकसान करतात." जगवीर म्हणाला, "त्या बाबतीत जरा शंका असते. एखाद्या शेतकन्याला विचारून पाहा, त्याला कोणाचे जास्त भय वाटते, सैन्यांतील शिपायांचे का चोरांचे म्हणजे खरी गोष्ट लक्षात येईल, चौर सैनिकाप्रमाणे एसायाचा अपमान नाही करीत." काश्मीरवर्मा हणाला. 'पण मलाच पाहा की सैन्यांत असून सुद्धा मी फिती धन, मान व कीर्ति मिळविली आहे. सर्वजण माझा आदर करतात. नाही तर तूं, एक फटिंग भिकारी. नाही पर नाही दार! एवढेच नाही तर खाण्याची सुद्धा प्रांत. तुझा मान किती आहे हे तुलाच ठाऊक, शिकाय च्या भितीने पळत सुटणान्या त्या लांडल्या- प्रमाणे आहे तुझी स्थिति." जगवीर म्हणाला. तोपर्वत काश्मीरवर्माचे जेवण झाले होते. तो म्हणाला “महाराज, आपल्या दोषांत जर काही फरक असेल तर तो फक्त पैशाचाच. जर आपल्याजवळ असलेले धन माझ्याजवळ असते तर मीहि महा योद्धा झालो असतो. आणि आपण सुद्धां गरीब असतां तर चोरी केली असतीत, असे नका समजू की चोरांच्या मनातील मनुष्यता अगदी नष्ट होते. आपण मला आंत बोला- बून जेवावयास वाढले ल्या बद्दल मी फार आभारी आहे. आणि मला जर चोरीच करावयाची असेल तर मी आपला गळा दावून हे सर्व सोने, चांदी आदी सहज घेउन जाऊ शकेन. आपण म्हातारे आहांत, एकटे आहांत, मी अजून तरूण आहे. माझ्या रक्तात खुमखुमी आहे. परंतु मी आपल्या केसालाहि धका लागणार नाही." हे ऐकून जगवीरवाला फार राग आला. तो एकदम ओरडून म्हणाला-"हलका! तुला माणसां माणसांतील फरक सुखां कळत नाही. काय उपयोग तुझ्या पांडित्याचा. तुला आंत येळ दिले हीच मी मोठी चूक केली.
जेवण तर झालेंच, पण आता तूं एक क्षण भर देखील येथे थांबू नकोस. चल चालता हो." या बेळे पर्यंत पाहाट होऊ लागली होती. काझीरवर्मा ताबडतोब उठला व म्हणाला-"आपल्याला कीर्ति मिळाली असेल, पण आपली मति मात्र गेलेली दिसते आहे." आणि तो बाहेर निघून गेला. बेताळाने इतकी गोष्ट सांगून राजाला विचारले की काश्मीरवर्मा धंदेवाईक चोर आहे, त्याचे मित्र चोर जुगारी आहेत. त्याला घरदार नाही. धन-दौलत नाही. कोणी त्याला आपला म्हणणारा नाही. भुकेच्या ओठी अन्न घालणाराहि कोणी नाही. मग त्याला एवढा अभिमान कसला? त्याला वास्तविक परि- स्थितीचा पश्चानाप कसा नाही वाटत. आप- ल्याहून गुणानें, वियेने थोर असतील त्यांचा आदर का नाही करीत ! जर उत्तर माहीत असून सांगितले नाहीस तर तुझें डोके फुटेल."
'ज्याला मरायची इच्छा नसते त्याला कसे तरी जगण्यावांचून उपाय नसतो. आणि जगण्यासाठी काय करावे लागते ते सर्व त्याने केले होते. म्हणून त्याला आपल्या बागाभ्याची लाज वाटली नाही. ज्याला चांगुलपणाने जगता येणे शक्य असते, परंतु जो तसे जगत नाही स्यालाच पश्चाताप होतो. त्याला जगवीरवर्मा बद्दल जरासुद्धा आदर वाटला नाही. त्याचे कारण म्हणजे युद्ध करणाराबद्दल त्याला सहानुभूति कधी वाटत नव्हती. जगवीरवाला चोराबद्दल जितका तिटकारा बाटत होता तितकाच तिटकारा काश्मीरवाला सैनिका- बद्दल वाटत असे. म्हणूनच त्याने त्याच्याबद्दल कृतज्ञता सरदाखवली. परंतु त्याच्यामोठेपणाला मान देऊ शकला नाही." विकमार्क म्हणाला. या प्रमाणे राजाचे मौन सुटतांच बेताळ शबासह त्या पूर्वीच्या वडाच्या झाडावर जाऊन लटकू लागला. (कल्पित)