विनाकारण मोडलेले लग्न
विकमार्क काहीहि न बोलता ल्या वडाच्या झाडाजवळ गेला, तें शव उचकन खांद्यावर टाकले आणि स्मशानाच्या वाटेने चालं लागला. चार पावले गेला असेल नसेल तो शयांतील चेताळ बोर लागला. म्हणाला- 'राजा, मला हे समजत नाही की तूं हैं सर्व कशासाठी करीत आहेस. मला असे वाटते की तूं प्रमोदप्रमाणे व्यर्थ आपल्या सुखाला आंचवत आहेस. तो आपल्या सुखाला कसा आंचवला, तो गोष्ट तुला सांगतो. ऐक म्हणजे तुला चालण्याचे कष्ट पण भासणार नाहीत." गौतमी नदीच्या डोंगराळ प्रदेशांत एके ठिकाणी एक मोठे खोरे होते. त्यांत काही भरें होती. तेवढेच तेथील गांव. त्यांत राहाणाऱ्या लोकांना बाहेरील जगाशी की संबंध येत नसे. तेथे सूर्यकिरणे उशीरा पोहोचत असत. त्या सोन्यात जागोजागी पाण्याचे ओहोळ असल्याने तेथील लोकांनी सुंदर बागा व मळे लावले होते. शेतें बनविली होती. त्यामुळे ती जागा स्वर्गातील नंदनवनासारखी वाटत होती. प्रमोदचे वडील याच गांवांत राहात होते. तेथेंच प्रमोदचा जन्म झाला. तो सुख- वस्तु बापाचा एकुलता एक मुलगा होता. एकदा प्रमोद आपल्या बापाबरोबर फिरावयास गेला. त्यावेळी त्याचे वय पांच सहा वर्षांचे असेल, फिरत फिरत ते दोघे घाट चढ्न टेकडीच्या एका टोकावर पोहोचले. दूर वरचा प्रदेश पाहून प्रमोदला आश्चर्य वाटले. तो आपल्या बापाला म्हणाला- 'बाबा, जग इतके का मोठे आहे?" "अरे जग फार मोठे आहे. त्यांत मोठमोठी शहरे आहेत. मोठमोठे पर्वत आहेत, नद्या आहेत, समुद्र आहेत." बाप म्हणाला. प्रमोद फार चौकस होता. तो रोज जगाविषयी आपल्या बापाला विचारीत असे. जसजशी त्याला माहिती मिळत गेली तसतशी जग पाहाण्याची त्याची उत्सुकता वाढत गेली. तो नेहमी त्याचाच विचार करू लागला. प्रमोद सोळा वर्षांचा झाला. त्याला जगाचा फेरफटका करून येण्याची आतां अनावर इच्छा झाली. त्याच सुमारास त्यांच्या गांवांत परगांवाहून एक रहस्य आला, प्रमोदनें त्याच्याशी ओळख करून घेऊन मैत्री केली. त्याच्याकडून जगांतील अनेक आश्चर्यकारक गोष्टी विषयी माहिती मिळविली. तो मोठ्या आवेशाने म्हणाला-" म्हणाला-"हाय, माझे सारे आयुष्य या येथेच गेले. हे सर्व जग मी केव्हां एकदा पाहीन असे झाले आहे मला."
या विशाल विश्वाला पाहून किंवा पर्वत, खोरी, गया व समुद्र पाहून का तुला जास्त सुख मिळेल ! अरे, मोठमोठ्या राज- वाड्यांत सुद्धा आनंद, सुख व शान्ति मिळत नाही. तुला आनंद आणि सुख पाहिजे असेल, तर तूं ही जागा सोडून कोहि जाऊं नकोस." त्या परदेशी गृहस्थाने सांगितले. " एब. मोठे जग असून या एका लहानशा खोन्यांत बसण्यांत काय मजा आहे?" प्रमोद म्हणाला. " हे जग एवढे मोठे आहे की त्यांतील सर्व ठिकाणी हिंडणे कोणालाच शक्य होत नाही. आणि फक्त हे एक जगच काय ! ही मुष्टि किती मोठी आहे याचा विचार कर. आपल्या डोक्यावरचे आकाश पहा. सांत असंख्य तारे आहेत, तेथपर्यंत पोहोचणे काय शक्य आहे! आपल्या जगासारखी कितीतरी जगें आदेत. हे सर्व पाहाणे काय शक्य आहे!" त्या गृहस्थानें प्रमोदला मुष्टिनी कल्पना दिली. त्याचा परिणाम असा झाला की प्रमोदचा जग पाहण्याचा उत्साह कमी झाला. आपले गांव सोडून सुद्धा तो कोठे गेला नाही. आपल्या संपत्तीची देखरेख करीत त्याच गांवांत सुखाने राहू लागला. प्रमोद तेथेच राहिला खरा पण त्याच्या चित्ताला शांति नन्हती. गांवांत त्याची सर्वांशी ओळसी असून सुद्धा सर्व त्याच्या पासून दूर राहात असत. प्रमोद आतां लयाला झाला होता. गांवांत योग्य अशा बऱ्याच मुली होत्या. पण त्याला त्यांत एक सुद्धा पसंत पडली नाही. काही दिवसांनी त्याने लमाचा विचारहि सोडून दिला. त्या खोऱ्यांत कुलशेखर नांवाचा एक रहिवाशी होता. तो प्रमोदला म्हणाला- "मला एक महीनाभर तुझ्या घरांत राहावयास जागा दे, कारण मी पर बांधायला काढले आहे. आणि ते बहुतेक एका महिन्यांत बांधून होईल." प्रमोद आपल्या दोषां नोकरांबरोबर राहात असे. त्यामुळे त्याचे घर रिकामैच होते. त्याने कुलशेखरला राहावयास जागा दिली. तो आपली मुलगी मंदाकिनी हिला घेऊन तेथे राहावयास गेला. प्रमोदनें ऐकले होते की मंदाकिनी सुंदर आहे आणि तिने पुष्कळशा मुलांना ख्याला नकार दिला होता. त्याच्या घरांत राहावयास आल्यापासून प्रमोदला तिच्या विषयी आकर्षण वाटू लागले होते. दिवसे- दिवस त्याचे हे आकर्षण प्रेमांत बदललें. तरी त्याने आपल्या वागण्यांतील मर्यादा सोडली नाही, किंवा कसल्याहि तम्हेचा उतावळेपणा दाखविला नाही. त्याने कुल- शेखराजवळ गोष्ट काढली. तो म्हणाला- "तुम्हांला आणि तुमच्या मुलीला जर काही हरकत नसेल तर मला तुमच्या मुलीशी विवाह करण्याची इच्छा आहे." कुलशेखराने होकार दिला. हा ठरलें. फक्त मुहूर्तच ठरावयाचा बाकी होता. बाकी सर्व ठीक झाले. अशा परिस्थितीत एकदा ती दोघे डोगरावरून बोलत बोलत येत होती. बाटेंत त्यांना एके ठिकाणी सुंदर सुवासिक फुलें दिसली. मन्दाकिनीने ती तोडली आणि कांही आपल्या डोक्यांत पालन काही हातांत तशीच घेऊन प्रमोदकडे आली. तिच्या हातांत ती सुंदर फुले पाहून प्रमोद म्हणाला-“फुले झाडांवरच चांगली दिसतात आणि ती पाहून मनाला आनंद होतो." 'मला तर फुलें पाहिल्याबरोबर ती तोडून घेण्याचा अनायर मोह होतो.
मला फुले फार आवडतात." मन्दाकिनी म्हणाली. दो बोलत बोलत भरी गेली. दुसरा दिवस उजाडला, सकाळी मन्दाकिनी दृष्टीस पडतांच प्रमोद म्हणाला-"रात्रभर एक गोष्ट माझ्या डोक्यात घोळत होती. तेव्हांच तुला विचारावी म्हणून प्रयत्न केला. म्हणून आतां विचारतो. हे बघ, आपण दोघे सध्या किती प्रेमाने आणि आनंदाने राहात आहोत. आपल्या आनंदाला पारावर राहात नाही. मग लम केल्यानेच काय मोठी त्या सुखांत जास्त भर पडणार आहे? तुला कसे बाब बाटते।" मन्दाकिनीने प्रमोदच्या विचारांत बदल झालेला पाहिला. ती म्हणाली-" तुमच्या इच्छेविरुद्ध तुम्ही माझ्याशी लम करावे असें मला मुळीच बाटत नाही. लयाची गोष्ट तुम्हीच काढलीत. बरें! जे झाले तें झालें, आता याविषयी काहीहि बोरू नका." आपल्या विचाराचा मन्दाकिनीला राग आला आहे, हे त्याने ताडले. पण तो घालविण्यासाठी काय करावे हे त्याला कळेना. त्यानंतर मन्दाकिनीने आपल्या वडिलांना सांगितले. ती म्हणाली-" बाबा, मी बराच विचार केला आणि शेवटी निश्चय केला आहे की कोणत्याहि परिस्थितीत प्रमोदशी ला करणार नाही." मन्दाकिनीच्या या सांगण्यामुळे लमाची गोष्ट तेथेच थांबली. कुलशेखराचें घर बांधून तयार झाल्याबरोबर तो आपल्या मुलीला घेऊन आपल्या घरी गेला. काही दिवसांनी सुयोग्य यर शोधून त्याने आपल्या मुलीचे लम करून दिले. ती आपल्या घरी सुखाने नांद लागली, प्रमोद मात्र जन्मभर अवि- न्याहितच राहिला. त्यानंतर तो दुसऱ्या कोणावरहि प्रेम करू शकला नाही.
इतकी गोष्ट सांगून वेताळ थांबला. म्हणाला-"ज्या मुलीवर प्रमोदने प्रेम केलें, ती मुलगी त्याच्याशी सम करण्यास तयार असून सुद्धा प्रमोदने नकार दिला. त्याने हा मूर्खपणा का केला? जर या प्रश्नाचें उत्तर तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची छकले छकले होऊन जातील." 'हा काही मोठा गहन विचाराचा प्रश्न नाही. याचे उत्तर अगदी सरळ आहे. प्रमोदला नुसता आनंद पाहिजे होता. प्रत्यक्ष अनुभवाची त्याला इच्छा नव्हती. अनुभवाशिवाय नुसता आनंद मिळू शकतो. ही गोष्ट तो सोळा वर्षांचा असल्यापासून त्याला कळली होती आणि म्हणूनच त्याची जगाचा फेरफटका करण्याची उत्कट इच्छा नाहीशी झाली. त्यानंतर मन्दाकिनीने जेव्हा झाडाची फुले तोडली तेव्हां त्याला कळून चुकले की प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर मग आनंद कमी होतो. त्याचप्रमाणे मन्दाकिनीच्या सान्निध्याने किंवा सहवासाने आपल्याला जो आनंद होत आहे तो लम झाल्यावर राहाणार नाही आणि मन्दाकिनीला नुसता आनंद नको होता. तिला अनुभवाचीहि इच्छा होती. म्हणूनच तिने आपल्या अनुभवमुखासाठी झाडावरची फुले तोडून घेतली. अनुभवा- शिवाय नुसता आनंद लुटण्याची इच्छा दाखविणाऱ्या व्यक्तीपासून अनुभव इच्छि- जाच्या व्यक्तीला काय सुख मिळणार? ही गोष्ट समजूनच मन्दाकिनीनें प्रमोदशी लम करण्याचे नाकारले." अशा तन्हेनें राजाचे मौन भंग झाल्या- वर वेताळ शवासह अदृश्य झाला आणि पूर्ववत् झाडावर लटकू लागला.