अंगारवती
विक्रमार्फ पुन्हा वडाच्या झाडाजवळ गेला. प्रेत झाडावरून उतरवून खांद्यावर टाकलें आणि स्मशानाकडे जाऊ लागला. दोन पावले गेल्यावर पेतांतील वेताळ बोल लागला. म्हणाला-"राजा । धन्य आहे धन्य आहे तुझ्या धैर्याची. तरी तुला बाट कंटाळवाणी बाई नये म्हणून मी तुला अंगारवतीची गोष्ट सांगतो." असे सांगून त्याने गोष्टीस सुरवात केली. उदयसेन हा बत्स राज्याचा राजा होता. राज्याची राजधानी कौशाम्बी येथे होती. त्यावेळी लावणक नांवाच्या गावी बुद्धदत्त नावाचा एक क्षत्रिय राहात असे. अंगारवती त्याची मुलगी होती. बुद्धदत्त ज्या गांवीं राहात असे ते अगदी पद्धतीचे गांव असल्या- मुळे अंगारवती आपल्या घराचा उंबरठा ओलांडून की कोठे जात नसे. त्यामुळे चार लोकांत जाणे येणे, त्यांच्यांत मिसळणे वागणे हे अंगारवतीला माहीत नव्हते. तिचा बाप सुद्धां सदा सर्वकाळ घरांत कांहीं तरी करीत बसत असे. अंगारवती मोठी झाली. भापल्या पुढील - आयुष्याविषयी तिच्या मनात काहीतरी कल्पना यायला हवी होती. परंतु ती इतकी अबोध होती की आपल्या लयाची कल्पना सुद्धा तिच्या मनांत आली नाही. वत्स देशाचा राजा शिकारी साठी त्या भागांत आला होता. त्याच्या बरोबरच्या मित्र मंडळीत चण्डसेन नांवाचा तिशीच्या घरांतला एक शूर बोखा दोता. वत्स राजाकडे नोकरीला लागून त्याला फार दिवस झाले नव्हते. एक दिवस चण्टसेन जंगलांत गेला असता त्याला पाऊलवाट दिसली. तो त्या रोखाने निघाला तर त्याला बुद्धवचाचे गांव लागलें. तेथे त्याने अंगारवतीलाहि पाहिले. त्याने बुद्धदनाची ओळख करून घेतली. आपली ओळख सांगितली. नंतर त्याने बुद्धदताची माहिती काढून घेतांना अंगारबतीचीहि माहिती मिळविली. त्याला जेव्हां करलें की ती अजून कुंवारी आहे तेव्हा त्याने तिच्याशी ला करण्याची आपली इच्छा तिच्या बापाजवळ व्यक्त केली. चण्डसेनाचा विचार ऐकून बुद्धदत्ताला आश्चर्य वाटले व आनंदहि झाला. कारण मुलीसाठी वर शोधणे किती कठीण काम आहे, हे कोणाला माहीत नाही! चण्डसेन सारखा कुलशीलवान जांबई त्याला शोधून मिळाला नसता. त्याने होकार दिला. बुद्धदत्त विचार करूं लागला माझी मुलगी आतापर्यंत या असल्या खेडे- गांवांत कष्टांत वाढली आहे. ती कौशाम्बीला गेली म्हणजे मुखी होईल.
अंगारवतीला बापाचा विचार अमान्य नव्हता. परंतु चंडसेनला पाहिल्याबरोबर तिच्या मनांत प्रेम उत्पन्न झाले नाही. तरी पण तिला वाटले की असा पति मिळणे म्हणजे भाग्यच असावे लागते. साधारण एक आठवख्यानंतर चण्डसेन बुद्धदत्ताकडे आला. म्हणाला-" मी आपल्या गांबी जात आहे. तेथे माझ्या घरच्या लोकांचा व मित्रांचा विचार घेऊन लयाचा मुहूर्त ठखून आपल्याला कळवितो. मग तुम्हीं लमाची तयारी करा." एवढे सांगून तो कौशाम्बीला निघून गेला. चण्डसेन गेल्यानंतर त्याच्या विषयी किंवा आपल्या लयाविषयी अंगाखतीच्या मनांत कोहि कसलाहि विचार आला नाही. तिच्या मनांत चण्डसेनाबद्दल प्रेमभाव सुद्धा उत्पन्न झाला नाही. आठवड्यामागून आठवडे गेले तरी चण्टसेनाकडून काही निरोप आला नाही. परंतु त्यामुळे तिला जरा सुद्धा निराशा बाटली नाही. कारण तिला वाटले 'नसेल त्याला माझ्याशी लग करावयाचे. माझे सारे आयुष्य खेडेगांवांत गेलेलें. कसे आवडणार हे त्याला. आणि खरेच आहे, माझ्या सारखीशी त्यांचे लग्न होणे बरे नसावे. जाऊ दे, काय मोठेसे त्यांत !" बुद्धदत्त मात्र त्याच्यावर पूर्ण विश्वास आणि भरंवसा ठेवून स्वस्थ बसला होता. तो मधून मधून म्हणत असें-" यांचे कुळ फार उत्तम आहे. यांच्या कुळांतील विशेष गोष्ट म्हणजे प्राण गेला तरी शब्दास जगणारे आहेत हे लोक. अगदी शब्दाचे धनी." या एवढ्या काळांत कौशाम्बीत अगदी उलटापालट झाली होती. होती. योगन्धराय उदयसेनाचा मंत्री होता. त्याने बरीच खटपट करून मगध राजाची मुलगी वासवदना हिच्याशी उदयसेनाचे लम करून दिले आणि त्या दोन्ही राज्यांत मैत्री जमवून आणली. त्या नंतर योगन्धरायाने दिग्विजय करण्याचा निश्चय करून मगध देशाकडून सैन्य मागविलें. तेथून येणान्या सैन्याने लावणक गांवांत पडाव टाकला. आसपासचा प्रदेश हस्तगत करण्यासाठी त्यांना तेथे काही दिवस रहावयाचे होते. गांवांत सैन्य आल्याने लोकांची त्रेधा उडाली होती. एकदां अंगारवती आपल्या घराच्या ओसरीवर उभी असता तिने आपल्या घरा समोरुन एका सैनिकाला जातांना पाहिलें. तो साधारण पंचविशीतला तरणाबांड देखणा तरुण होता. परंतु त्याच्या चेहेचावर एका तन्हेचे औदासीन्य दिसत होते. त्याला पाहाताच अंगारवतीच्या मनांत चलबिचल उत्पन्न झाली. न कळत तिचे त्याच्यावर मन बसले, तीच स्थिति त्या सैनिकाची झाली. त्याचेंहि तिच्यावर मन बसलें. पण कोणी कोणाशी बोलले मात्र नाही. ल्या दिवसापासून तो सैनिक रोज बुद्ध- दत्ताच्या थराच्या बाजूने जात असे. अंगारवती सुद्धा त्याच्या दर्शनाने आनंदित होत असे. त्याचे नांव शतानीक होते. एकदा तो अंगार- बतीच्या घरासमोरून जात होता. त्या वेळी अंगाखती सुद्धा आपल्या घराच्या दरवाज्यांत उभी होती. शतानीक हिंमत करून तिच्याशी बोलला, ती त्याच्याशी थोडे मोकळेपणाने बोलली. तिने त्याची हळू हळू सर्व माहिती काढून घेतली. तो उज्जयनीचा राहाणारा असून त्याच्या घरी त्याच्या म्हाताच्या आई- शिवाय दुसरे कोणी नव्हते. तो आपल्या आईची सेवा मनापासून करीत असे. परंतु जांवयाच्या दिविजयासाठी मगधराजाने सेना पाठविल्यामुळे त्याला सैन्यात भरती होऊन इकडे यावे लागले. आपली आई फार कष्टाने दिवस घालवीत असेल म्हणून त्याला फार वाईट वाटत होते. तो अंगारवतीला म्हणाला-"या जंगलांत कोणच्या मुहूर्तावर येऊन पडलो आहे. अजून किती दिवस राहावे लागणार आहे का आणि कोठे जाऊन युद्ध कराये लागणार आहे कोण जाणे! त्या युद्धांतून जिवंत घरी पोचलो तर ठीक आणि मी जाईपर्यत माई जिवंत असली तर पुन्हा आमची भेट. केव्हा केव्हां वाटते की आत्महत्या करून हे परावलंबी आयुष्य संपवून टाकावे. पण तुला पाहिल्या पासून मला पुन्हा जगाचा मोह मनांत बाहूं लागला आहे." अंगारवतीला शतानीकमद्दल एक तन्हेचा जिल्हाळा वाटू लागला. प्रथम दर्शनीचे प्रेम दुणावले. चण्डसेनकडून बरेच दिवस झाले. काही हि बातमी निरोप नव्हता. त्याला आप- ख्याशी लझ करावयाचे नसेल. अशीच तिची कल्पना झाली. म्हणून तिचे मन शतानीक- बरोबर ला करण्यास प्रवृत्त झाले. पण तिला बास्त होते की ही गोष्ट आपल्या वडिलांना आवडणार नाही.
असे काही दिवस गेले. एक दिवस शतानीक अंगारक्तीकडे आला व म्हणाला- आज रात्री मी कोणालाहि कळविल्या- शिवाय मगध देशाला निघून जाणार आहे. मला आतां जिणे नकोसे झाले आहे. आपल्या गांवी लाकडे फोडून मी आपले दिवस कंठीन. त्यांत मला जास्त सुख आहे. मी एवळ्यासाठी आलो आहे की तूं माझ्या- बरोबर येणार असशील तर चल, आपण लम करून आनंदांत राहू. माझी आई नकार देणार नाही." अंगारवतीने आपली संमती दिली. मग ठरला दोघांचा बेत. शतानीकने तिला तिच्या घराच्या शेजारच्या वडाच्या झाडाखाली आपले सामान घेऊन येऊन वाट पाहण्यास सांगितले. तिनें तें कबूल केलें. अंगारवतीला माहीत होतें आपलें हें काम बापाला मुळीच आवडणार नाही, म्हणून बाप झोपी गेल्यावर ती उठली. आपले सामान बांधले व ते घेऊन हलकेच घराबाहेर पडली व शतानीकनें सांगितलेल्या वडाच्या झाडा- खाली जाऊन त्याची वाट पहात उभी राहिली. थोड्या वेळाने दोन व्यक्ति बोलत बोलत त्या झाडाजवळ आल्या. अंगारवतीने ओळखलं की त्यांतील एक व्यक्ति नण्डसेन आहे. ती एक बाजूला जाऊन उभी राहिली. चण्डसेन आपल्या मित्रास म्हणत होता- "असेच सरळ गेलें म्हणजे या रस्त्याला दोन रस्ते फुटतात. एक बुद्धदत्ताच्या घराकडे द एक पडक्या देवळाकडे जातो. आपण सकाळपर्यंत त्या देवळांत राहूं आणि उजाड- ल्यावर बुद्धदत्ताकडे जाऊं, इतके दिवस झाले मी त्यांना काहीहि निरोप पाठविला नाही. काय म्हणत असतील ते, कोण जाणे. पण काय करणार ! शक्यच झाले नाही कळवावला." ते दोघे खरोखरच देवळाच्या बाजूला बळले.
थोड्या वेळाने शतानीक आला. त्याने हळूच अंगांरखतीला बोलाविलें. ती पुढे आली आणि म्हणाली-" मला क्षमा करा. मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. हे सांगायलाच मी येथे आले आहे." शतानीकाला निराशा बाटली. "माझ्याशी लम करणे तुला शक्य नाही काय?" त्याने विचारले. शक्य नाही. म्हणून तर सांगायला आले. नाहीतर मी आपल्याबरोबर आलें असतें." अंगारवती म्हणाली. शतानीक एक निवास सोडून आपल्या वाटेनें निघून गेला. अंगारवती आपल्या घरी परतली. दुसया दिवशी चण्डसेन बुद्धदचाकडे आला. म्हणाला-"इतके दिवस मी नुसता राजाचा नोकर होतो. आपल्या बायकोचे पारनपोषण करण्यासारखी माझी स्थिति नव्हती. पण आता मला राजाने जाहागीर दिली आहे. मी आपल्या मुलीशी रन कान तिला घेऊन जाण्यासाठी आलो आहे." बुद्धदत्ताने ठरल्याप्रमाणे अंगारवतीचे त्याच्याशी लग्न लावून दिले व तिला त्याच्या बरोबर पाठवून दिले. इसके सांगून वेताळ थांबला व राजाला म्हणाला- “राजा, अंगारवतीने शतानीक- बरोबर सम न करतां चण्डसेनबरोबर को केलें! शतानीकवर तिचे प्रेम नव्हते काय ! का चण्डसेन बरोबर लग्न केल्याने धन-दौलत पुष्कळ मिळेल असे वाटलें । तुला माहीत असून जर तूं उत्तर दिले नाहीस तर पहा, तुझे डोके फुदन तुझ्या पायाशी पडेल." "अंगास्वतीमचे स्वार्थ मुळीच नव्हता. जर तसे असते तर ती एकाद्या गरीब शिपायाबरोबर ला करण्यास तयारच झाली नसती आणि निस्वार्थी लोक प्रेमासाठी धर्म सोडणार नाहीत. तिचे शतानिकावर प्रेम बसले. पण त्याचा संबंध तिच्या पुरताच होता. चण्डसेनशी लग्न करणे तिचे कर्तव्य होते. कारण त्या पर्तव्यधर्माचा संबंध तिच्या वडिलांशी होता. धर्म व प्रेम या दोन गोष्टी तिच्यासमोर उभ्या होत्या तेव्हा तिने विचार करण्यांत वेळ न घालवितां धर्माला प्रथम स्थान देऊन स्वार्थी प्रेमाचा त्याग केला." राजा म्हणाला. राजाचे मौन भंग होतांच वेताळ प्रेतासद अदृश्य झाला व बडाच्या झाडावर जाऊन बसला.