सावत्र आईचा आशीर्वाद
विकमार्क वडाच्या झाडाजवळ गेला. शव काढून खांद्यावर टाकले व मुकाट्याने स्मशानाची वाट धरली. चार पावले गेल्यावर शांतील वेताळ बोले लागला. इतका त्रास होत असतांना सुद्धा तू आपला प्रयत्न सोडीत नाहीस. खरोखर ही गोष्ट फार आश्चर्याची आहे. साधारण माणसाच्या हातून होणारी ही गोष्ट नव्हें, देवलची गोष्ट ऐकलीस की तुला हें पटेल," असे सांगून वेताळानें गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला. सिंथांतांत सिंधु नदीच्या काठी एका गांची देवल नांवाचा माणूस राहात असे. त्याच्या जवळ थोडीफार जमीन होती. त्यांतून तो आपल्या कुटुंबापुरतें काही तरी उत्पन्न काढीत असे. नवरा, बायको व मुलगा तिघांचे भागत असें त्यांत. पुढे काही दिवसांनी त्याची बायको आजारी पडली. आपण आतां जगत नाहीं असें वाटल्यावरून बायकोने आपल्या नवऱ्याला जवळ बोलावून म्हटलें-"मी आतां कांहीं जगत नाही. माझ्या लाडक्यासाठी जीव भड- कून राहिला आहे. कोणत्याहि नीला आपल्या मुलाइतकें दुसन्याचे मूल आवडत नाही. गरें, त्यांतून दुसरे काम केलेंतच तर आपल्या या मुलाकडे दुर्लक्ष करूं नका." इतकें सांगून तिने डोळे मिटले ते पुन्हाँ उघडले नाहीत. बायकोच्या मरणाने देवलला फार दुःख शाले. काही दिवस तो अगदी उदास होता
पुढे कालक्रमाने त्याचे दुःख ओसरून गेलें. काही दिवसांनी त्याने रोहिणी नांवाच्या एका उपवर मुलीशी ला केले. पुन्हां त्याचा संसार सुरळीतपणे थाटला गेला. रोहिणी शाहणी व प्रेमळ होती. ती आपल्या सावत्र मुलाला प्रेमाने वागवीत असे. हे पाहून देवाला समाधान वाटलें. आनंदाचे अभ्यासाकडे फार लक्ष असे. व्यवस्थित चालले होते त्याचे शिक्षण, त्याला काम यावे म्हणून वडील त्याच्या- कडून कामे करून घेऊ लागले. तरी आई त्याला करूं देत नसे. रोहिणीला हि दोन मुले झाली, एक मुलगा व एक मुलगी. पण तिथे इतके मिळून राहात असत, जशी सख्खी भावंडे आहेत. त्यांच्याकडे एक गाय होती. अगदी लहान वासरू असल्यापासून देवलने तिला पाळले होते. म्हणून तिच्यावर त्याचे फार प्रेम होते. ती म्हातारी झाली होती. एकदा ती अचानक आजारी पडली. देवलने एका अनुभवी वयस्कर माणसाला बोलावून आणले. त्याने आपल्या अनुभवाने आणि कल्पनेनें काही उपचार सांगितले. परंतु कशानेंच गुण आला नाही. त्याला वाटले की आपल्या गाईवर कोणी तरी मंत्र घातला आहे. मांत्रिकाकडे गेल्यास तो गाईला ठीक करील. त्याच्या ओळखीचा रुद्रदेव नांवाचा एक गवळी होता. त्याला मंत्रतंत्र माहीत होते. एक दिवस सकाळी उठून देवल त्याच्या घरी गेला. परंतु त्यावेळी तो त्याच्या झोपडीत नव्हता. शेजारच्या जंगलांत कोठे तरी असेल असे वाटल्यावरून तो तेहि गेला. देवल बराच वेळ इकडे तिकडे हिंडला, परंतु त्याला रुखदेव भेटला नाही. तो निराश होऊन येत असता एकदम एका झाडाच्या मागून येउन देवल समोर उभा राहिला आणि दरडावून म्हणाला- 'कोण हूँ! काय काम आहे तुझें येथे." देवलने भीत भीत आपल्या गाईच्या आजाराची गोष्ट त्याला सांगितली. तो म्हणाला-"तू आपले वचन पाळले नाहीस ना! म्हणून तुला अद्दल घडण्यासाठी त्याची बाथा गाईवर आली आहे." " कोहि करून माशी गाय बांचवा हो." मी तुमच्या पाया पडतो. बाला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आपल्या मुलांपैकी कोणा एकाचा पळी दे. म्हणजे तुझी गाय यांचेल, रुददेवाने सांगितले. "
मनुष्य बळी! आणि तो सुद्धा माझ्या मुलाचा? ते शक्य नाही. माझ्या हातून तें होणार नाही." देवल महणाला, अरे, त्यासाठी तुला आपल्या मुलाला ठार करण्याची गरज नाही. फक्त तूं निश्चय कर की तू कोणाला बळी देणार आणि त्याच्या डोळ्यांत पाहा. त्याला शिंक येईल. तेव्हा तुं त्याला “शतायुषी भव" असें म्हणू नकोस. पुन्हा त्याच्या डोळ्यांत पहा. पुन्हां जेव्हां शिकेल. तेव्हां सुद्धा त्याला " सतायुपी भय" असा आशीर्वाद देऊ नकोस. अशा त-हेनें तो तीन वेळा शिकेल व त्यानंतर तो तुझा मुलगा राहणार नाही. पण तुझी गाय मात्र यांचेल. हें तुला वाटले तर कर." देवल विचारांत पडला. काय करावें त्याला सुचेना. आपल्या गाईला पाहतांच त्याला वाटले आपल्या पहिल्या बायकोनेंच तिला पछाडले असावे. मग यासाठी पहिल्या बायकोच्या मुलाचा बळी देणेच बरें. तिच्यासाठी हिच्या मुलांना कां मारावें ! हिला प्रायश्चित्त कशासाठी! देवल, मन फारच अस्वस्थ झालें. हो, ना, करता करतां त्याने आनंदाचा बळी देण्याचा ठरावल, या गोष्टीला त्याचा मन तयार झाले, परंतु त्याचा अंतरात्मा तयार होईना. कारण आनंद त्याचा लाडका होता आणि त्याची आई बारल्या नंतर सुद्धा त्याने त्याला लाडांत बाढविले होते. रोहिणीने सुद्धा त्याच्या प्रेमात भरच पातली. त्याचे मन गाईत व मुलांत घोटाळतां घोटाळतां एकदां स्थिर झालें, तो मनांत म्हणाला-'गाय मरते आहे ती मरूं दे. आपण त्याला काय करणार !' घरांत शिरतांच आजारी असलेली गाय त्याच्याकडे केविलवाणी मुद्रा करून पाहात असलेली दिसली. पुन्हा त्याचे मन डळमळलें, आपल्या मुलाचा बळी देऊन जर गाईचा प्राण वाचत असेल तर यांचविला पाहिजे. थोड्या वेळांत तिन्ही मुले खेळून बागडून जेवणासाठी घरांत आली. देवलने आनंदला आपल्या जवळ बोलाविले. त्याने त्याच्या डोळ्यांत पाहिले. आनंद शिंकला. पण देवलने “शतायुषी भव" असें जिभेवर येऊन सुद्धा महटले नाही. मग पुन्हां त्याच्या डोळ्यांत पाहिले. पुन्हां आनंदला शिंक आली. या वेळी हि तो कांही महणाला नाही.
देवलच्या मनांत भीति वाटू लागली. त्याला वाटले की आपण पुन्हा सुद्धा जर त्याला आशीर्वाद दिला नाही तर आपणच त्याला मारल्यासारसें होईल. तरी पण त्याने आपले मन घट्ट केले आणि पुन्हां त्याच्या ढोच्यांत निरखून पाहिले. आनंद त्याहि वेळी शिंकला. बाप गप्पच होता. त्याच वेळी नेमकी रोहिणी तेथे आली आणि शिंकेचा आवाज ऐकून 'शतायुषी' म्हणाली. ती आपल्या नवन्याला म्हणाली- "हा तीन वेळां शिंफला पण एकदा सुद्धा त्याला 'शतायुपी भव' महणाला नाहीत?"
काहीहि असो आईच्या आशीर्वादाने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा आनंदला कांही झाले नाही. पण गाय मात्र त्याच दिवशी मरून गेली. एवढे सांगून वेताळ राजाला म्हणाला- 'मला हे समजले नाही की देवल गाईला वाचविण्यासाठी आपल्या मुलाचा बळी देण्यास कां तयार झाला । त्याचे आपल्या मुलापेक्षां काय गाईवर जास्त प्रेम होतें। आणि देवल जर आपल्या मुलाला मारावयास तयार झाला होता तर रोहिणीने आशीर्वाद देऊन त्याला कशासाठी वांचविलें । माहीत असून तू जर मुद्दाम उत्तर दिले नाहीस तर तुझे डोके गळून तुझ्या पायाशी पडेल. माहीत आहे ना!" 'मुलावर कमी आणि गाईवर जास्त प्रेन होते म्हणून देवल, मुलाचा बळी देण्याचे उरविलें नाही. आनंद त्याचा लाडकान होता. परंतु त्याचे मन त्याला खात होते. कारण मरतांना आनंदाच्या आईने त्याच्या- फटून वचन घेतले होते, ते त्याने पाळले नव्हते. त्याच्या मते या पापाचे प्रायश्चित्त आनंदाचा बळी दिल्यानेच होईल. म्हणून तो बळी देण्यास तयार झाला. पापाच्या मितीने अज्ञानी जन अशीच पा करतात. रोहिणीचे मन शुद्ध होते. तिच्या मनांत पाप नव्हतेंव सवतीमत्सर देखील नव्हता. म्हणून तिने सहज निर्मल मनाने आनंदला आशीर्वाद दिला." आपसांतील संबंध किंवा आनंदाशी व्यवहार विपरीत असल्यामुळे या दोघांचे व्यवहार भिन्न झाले असे नाही, तर विचारांत क्षणिक बदल झाल्यामुळे ते विरुद्ध झालेले दिसले," विक्रमार्क म्हणाला. अशा तम्हेनें राजाचे मौन अंग होताच वेताळ शबासद अवश्य होऊन पुन्हां शाडावर जाऊन बसला. (कल्पित)