दॅट्स ऑल युवर ऑनर (भाग 5)
प्रकरण पाच.
पाणिनीने आपल्या जवळच्या किल्लीने ऑफिस चे दार उघडले.आत येताच कॉफीचा मस्त दरवळ आला.
‘‘ मला हव्ये एक मस्त कप भरून .आहे ना शिल्लक ? ‘‘ पाणिनीने सौम्या ला विचारले.
‘‘ आपल्या दोघांसाठीच केली आहे.‘‘ कॉफी चा कप पाणिनीसमोर ठेवत सौम्या म्हणाली. ‘‘ कशी झाली तुमची मैथिली आहुजा बरोबरची भेट ? ‘‘
‘‘ चांगली झाली आणि नाही पण. पोलीस आकृती च्या मागावर आहेत.‘‘
मैथिली आहुजा च्या स्कर्ट चा जो तुकडा त्याने कापून आणला होता तो त्याने खिशातून बाहेर काढला.
‘‘ काय आहे हे ? ‘‘ सौम्या ने विचारले.
‘‘ मला दोषी धरण्यात येऊ शकेल या सबबीवर मी या तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. ‘‘ पाणिनी मिश्कील पणे म्हणाला. ‘‘ बर तुला भूक लागली आहे का ? ‘‘
‘‘ मी वखवखल्ये.!‘‘
‘‘बर , पण आधी आपण दोघे एक कुकर्म करायला जाणार आहोत नंतर खायला जाऊ.‘‘
‘‘ आधी नाही का खाऊ शकणार?‘‘
‘‘ नाही , आपण अगदी कट्टोकट्टी काम करतोय.वेळ कमी आहे हातात., कनक कडून काय नवीन बातमी आहे का त्याला विचार फोन करून.त्याला म्हणावं आम्ही संध्याकाळी फोन करू .‘‘
सौम्याने त्याचा निरोप फोन वर ओजस ला दिला.
‘‘ तू इथे ऑफिस मधे बुटाची एखादी जादा जोडी ठेवली आहेस का?‘‘
‘‘ एक सोडून दोन जोड्या आहेत.एक उंच टाचांची आणि एक सपाट टाचांची.‘‘
‘‘ उंच टाचांचे बूट घाल.ते चिखलात खराब होणार आहेत.‘‘
‘‘ तुम्ही जरारहस्यमय बोलता आहात.नेमकं काय करणार आहोत आपण?‘‘
‘‘ आपण कायद्याच्या चौकटीतलीच गोष्ट करणार आहोत पण चौकटीच्या फार आत न राहता रेषेच्या अगदी खेटून राहणार आहोत.‘‘
‘‘ ? ‘‘
‘‘ पुरावा दडवून ठेवणे हा गुन्हा आहे, पुरावा नाहींसा करणे हा गुन्हा आहे पण माझ्या ज्ञाना प्रमाणे पुराव्यात वाढ करणे हा गुन्हा नाही, जर ती गोष्ट व्यवस्थित केली तर.‘‘ पाणिनी म्हणाला.
‘‘ पुन्हा तोच प्रश्न, आपण काय करणार आहोत नक्की?‘‘
‘‘ आपण एका ठिकाणी जाऊन काही गोष्टींची तपासणी करणार आहोत.तपासणी करत असतानाचे फोटो काढणार आहोत.आता हे सर्व करताना तुझ्या बुटाचे ठसे जर तिथल्या जमिनीवर उठले तर त्याला आपण काय करणार नाही का?‘‘ पाणिनीने अत्यंत निरागस चेहेरा करून सौम्या ला विचारले.
‘‘ अगदी बरोबर आहे.‘‘ सौम्या ने पुस्ती जोडली.
‘‘ विशेषतः आपल्या बुटाच्या ठशामुळे जर पोलीस अधिक सूक्ष्म पणे तपास करून योग्य तोच पुरावा गोळा करणार असतील तर त्यांच्या कामात आपण त्यांना मदतच करतोय असा अर्थ निघेल.
दोघेही सर्व तयारी घेऊन बाहेर जायला निघाले.
‘‘ आपण आता ज्या ठिकाणी तपन चे प्रेत सापडले, त्या ठिकाणी जातोय, म्हणजे कंपनीच्या आउट हाऊस कडे.‘‘ पाणिनीने सांगितले.
‘‘ कनक म्हणाला,की तिथे अजून पोलीस आहेत.‘‘ सौम्या ने माहिती दिली.
‘‘ मला माहिती आहे.पण आता अंधार पडायला लागलाय आणि माझ्या मते पोलीस आउट हाऊस च्या आत असतील , आपण जाणार आहोत ते बाहेरच्या रस्त्याला.टेकडीच्या उताराला.‘‘ पाणिनीने खुलासा केला
थोड्याच वेळात ते त्या आउट हाऊस जवळ आले. डाव्या बाजूला दुरून तिथे लागलेले दिवे दिसत होते. पाणिनीने आपली गाडी टेकडीच्या उतारावर थांबवली.
‘‘ तुला आता मी ज्या काही सूचना देणार आहे त्या तू कोणतेही प्रश्न न विचारता पाळ.मला काही खुलासा करायची वेळच तू आणून दिली नाहीस तर माझ्या मनात काय चाललंय हे तुला कळणार नाही, आणि माझी तीच इच्छा आहे.‘‘
‘‘ काहीतरी काळं बेरं करायचं असेल तुम्हाला.‘‘ सौम्या उद्गारली.
तो तिला रस्त्याच्या पलीकडे एका ढिगाऱ्याकडे घेऊन गेला.त्यावर पावसाच्या पाण्यामुळे ओलावा होता आणि त्यावर बुटाचे ठसे उमटायची शक्यता होती.
‘‘ मी तुला आता उचलणार आहे,तुझे पाय दुमड मी तुला उचललं की,म्हणजे मी तुला पाठीला ढकलून काटेरी तारेच्या कुंपणाच्या पलीकडे टाकीन.तुझा स्कर्ट तू स्वतः भोवती नीट गुंडाळून घे म्हणजे तारेत अडकणार नाही.नंतर तू ढिगाऱ्या वरून घसरत खाली ये.तिथे मी तुला धरून थांबवीन, जेव्हा तू खाली येशील तेव्हा तुझ्या बुटाचे ठसे त्या मातीवर उमटतील याची दक्षता घे.‘‘ पाणिनीने सविस्तर सूचना दिल्या.
त्या नंतर पाणिनीने तिला उचलून काटेरी तारे च्या कुंपणा पलीकडे टाकले. टाकताना आपला स्कर्ट काट्यात अडकणार नाही याची काळजी घेण्य साठी तिने तो गुढग्या भोवती घट्ट गुंडाळून घेतला. तिथून ती घसरत पुन्हा खाली आली.
‘‘ कसं जमलं हे मला ?‘‘ तिने विचारले.
‘‘ एकदम मस्त जमलं. ‘‘ पाणिनी म्हणाला.. ‘‘ मला हेच बघायचं होत की विशिष्ट परिस्थितीत मुलीने अशीच उडी मारली असेल आणि घसरली असेल तर तिने मातीवर आपल्या बुटाचे ठसे सोडलेच असतील ना? आणि तिच्या स्कर्ट चा एखादा तुकडा नक्कीच कुंपणात अडकला असेल. काय वाटत तुला सौम्या?‘‘
‘‘ स्कर्ट अडकला नसेल तर ती नशीबवानच म्हणायला हवी.‘‘ सौम्या ने कबुली दिली.
पाणिनीने आपल्या बरोबर आणलेला स्कर्ट च्या कापडाचा तुकडा बाहेर काढला आणि कुंपणाच्या तारेला असा अडकवला की अगदी नैसर्गिक वाटेल.
‘‘ आता नेमके काय घडले असावे ते बरोबर कळेल.आपण आता तुझ्या बुटांच्या ठशाचे आणि या कापडाच्या तुकड्याचे फोटो घेऊ.’’ तो म्हणाला.
‘‘ तुमच्या ही बुटांचे ठसे उमटलेत ‘‘
‘‘ माहित्ये मला ते पण ते विचारात घेतले जाणार नाहीत कारण पोलिसांची मानसिकता. ते प्रथम तारेत अडकलेला कापडाचा तुकडा बघतील.त्याचा ताबा घ्यायला ते गाडीतून घाईघाईत उतरतील.नंतर ते कुठे पावलांच्या खुणा दिसतात का बघायला सुरुवात करतील. तेव्हा त्यांना त्या उंचवट्या वरून खाली उतरलेले तुझ्या बुटांचे ठसे दिसतील.तेव्हा त्यांचा गोंधळ उडेल की तारेवर स्कर्ट चा तुकडा अडकलेली व्यक्ती त्या तारेजवळ आली कुठून आणि गेली कुठे.तो पर्यंत त्या ढिगाऱ्या खालील उतरंडीवर असंख्य जणांच्या बुटांचे ठसे उमटले असतील.तुझे, माझे, आकृती चे आणि पोलिसांचे पण. !‘‘
‘‘ तुम्हाला जी चाचपणी करायची होती ती झाल्ये ना करून? तर मग पोलीस इथे येऊन आपल्याला रंगे हाथ पकडण्य पूर्वी आपण निघू या का?‘‘
पाणिनीला हसायला आलं. ‘‘ तुला भूक लागलेलीच आहे आधीपासून तेव्हा हा पोलिसांचा बहाणा सांगून त्यांच्या प्रति अति आदर दाखवू नकोस ! ‘‘
त्या नंतर दोघे गाडीत बसून निघाले, वाटेत पाणिनीने त्याच्या फोटो ग्राफर कडे फोटो ची निगेटिव्ह दिली आणि मोठया आकारात ते छापून तयार ठेवायला सांगितले.नंतर हॉटेल मधे जाऊन त्यांनी जेवण घेतले मग ओजस ला फोन लावला.
‘‘ पोलीस तपास चालू आहे ‘‘ ओजस म्हणाला. ‘‘ पावणे सहा वाजता तपन बरोबर एक तरुणी त्याच्या गाडीतून बाहेर पडली हे त्यांना कळलंय त्यावरून ते पुढे जाताहेत.‘‘
‘‘त्या बद्दलच मला बोलायचं होत तुझ्याशी.‘‘ पाणिनी म्हणाला..
‘‘ तू कुठे आहेस अत्ता आणि काय करतो आहेस?‘‘ ओजस ने विचारले.
‘‘ मी अत्ता सौम्या ला घरी सोडतोय.आम्ही जेवायला गेलो होतो बाहेर.मी तुला काही फोटो दाखवणार आहे.‘‘
‘‘तू कायमच अर्धवट आणि रहस्यमय बोलतोस. ठीक आहे ये तू माझ्या कडे कसले ते फोटो घेऊन.‘‘
सौम्या ला घरी सोडून आणि फोटो ताब्यात घेऊन तो ओजस कडे आला
‘‘ पोलिसांच्या कार्य पद्धतीतले एक पान आपण चोरायचे आहे.‘‘ पाणिनीने आल्या आल्या सुरुवात केली.
‘‘ म्हणजे काय नक्की ?‘‘
“ मला सांग कनक, की सर्वात धोकादायक पुरावा कोणता समजला जातो?”
“ ओळख परेड मधून पोलीस साक्षीदाराकडून विशिष्ट व्यक्तीची ओळख पटून घेतात तो.” कनक म्हणाला. “ पण त्याला आपण काही करू शकत नाही.सगळ्याच साक्षीदारांची स्मरण शक्ती चांगली असतेच असे नाही.”
“ तू म्हणतोस त्यापेक्षा यात बराच अर्थ आहे.पोलिसांच्या पद्धतीत आणि माणसाच्या स्मरण शक्तीत एक मुरलेला असा दोष आहे.एक उदाहरण देतो, समज तुला एखाद्याने रस्त्यात पकडलं आणि लुटायचा प्रयत्न केला,आणि पोलिसांना तू त्याचं वर्णन ऐकवलस. पोलिसांना अशा प्रकारचे गुन्हे करणारा एखादा माणूस माहीत असतो, ते तुला त्याचे फोटो दाखवतात आणि म्हणतात मिस्टर ओजस, तुम्ही वर्णन केलेल्या हल्लेखोराच्या वर्णनाशी जुळणारा एक माणूस आहे, त्याचा फोटो तुम्हाला आम्ही दाखवतो, हा बघा, पण शांतपणे बघा , अजिबात हो किंवा नाही म्हणायची घाई करू नका.तुमच्या कडे हा फोटो ठेऊन द्या.अनेकदा नजरे खालून घाला.कारण फोटोत माणूस वेगळा दिसू शकतो.त्यामुळे खात्री करा. त्या नंतर दोन-तीन दिवसांनी तुला पोलीस फोन करून सांगतात की मिस्टर ओजस, तुमच्यावर हल्ला करणारा माणूस आम्हाला मिळालाय.तुम्ह चौकीत या आणि खात्री करा,त्याला आम्ही इतर पाच सहा लोकांबरोबर उभा केलाय, तुम्ही ओळखता येतंय का ते सांगा. तू नंतर चौकीत जातोस तेव्हा त्या पाच –सहा लोकांमध्ये तो उभा असतो.इतरांचे चेहेरे तुला नवीन असतात पण एक चेहेरा ओळखीचा असतो आणि हाच तो माणूस म्हणून त्याला ओळखण्याचा मोह तुला होतो. आता प्रत्यक्षात तू त्याला इतर लोकांमधून ओळखलस याच खर कारण असतं की तो तुला पोलिसांनी दिलेल्या फोटो शी मिळता जुळता माणूस असतो.पण तुझ्या वर हल्ला करणारा तोच माणूस असेल असे तू सांगू शकत नाहीस कारण तू तुलना करतोस ती फोटोतल्या माणसाशी, कारण तो फोटो तू सतत बघत आलेला असतोस पण हल्लेखोराला तू काही क्षणापुरते बघितलेले असते.” पाणिनी म्हणाला..
“ असे घडते अनेकदा मान्य आहे पण त्यामुळे प्रत्येक साक्षीदाराने गुन्हेगाराची पटवलेली ओळख चुकीचीच असते असे नाही.” कनक म्हणाला.
“ मला अगदी हेच म्हणायचं आहे.म्हणजे पोलीस जी युक्ती वापरतात ती युक्ती आपण यावेळी त्यांचे विरुध्द वापरूया.” पाणिनी म्हणाला..
“ म्हणजे काय करायचं?”
“ तू म्हणालास ना, की पार्कींग मधल्या वॉचमन ने पावणे सहाच्या सुमाराला तपन च्या गाडीतून एका तरुणीला तपन सह बाहेर पडताना पाहिलंय म्हणून? त्या माणसाला हा फोटो दाखव आणि विचार की हीच ती तरुणी होती का? त्याला सांग की लगेच हो किंवा नाही म्हणू नको, अनेकदा फोटो नजरे खालून घाल आणि सावकाश सांग.” पाणिनीने ओजस कडे मैथिली चा फोटो देऊन सांगितले.
“ थांब , थांब पाणिनी .हे करणे म्हणजे पुराव्याशी खेळणे आहे.” कनक म्हणाला.
“कसे काय?” पाणिनीने विचारले.
“ तू....तू.... दुसऱ्याला सक्तीने ओळखायला लावतो आहेस ” ओजस म्हणाला.
“ मी असले काहीही करत नाहीये, मी फक्त त्या वॉचमन ला विचारायला सांगतोय तुला की फोटो मधील मुलगी तू बघितली आहेस का ? ”
“ पाणिनी, तुला ते ज्या पद्धतीने करायचं मनात आहे, त्याला दुसऱ्याच्या डोक्यात कल्पना भरवणे असे म्हणतात.”
“ पोलीस वेगळ काय करतात? ”
ओजस ने नाईलाजाने पाणिनीच्या हातातून फोटो घेतला.
“ मी प्रयत्न करतो पण तो वॉचमन लगेच भेटण् अवघड आहे.कनकसांनी त्याला चांगलच ताब्यात घेतलं असणार.मी जर घाईघाईत त्याच्या कडे गेलो तर पोलिसांना संशय येईल.” कनकम्हणाला.
“ अरे बाबा , फार घाई नकोच करू. पण अगदी थंड पणे पण वागू नको.पहिली संधी मिळताच भेट त्याला.” पाणिनी म्हणाला..
“ ठीक आहे ,बघतो मी कसे करायचे ते.पण मी त्यासाठी पोलीस असताना त्या कंपनीच्या कारखान्यात जाणार नाही.तुला हवं ते मिळेल पण मला माझ्या पद्धतीने करूदे काम.” ओजस ने सांगितले.
“ आपण आज पुरते थांबू , पण उद्या सकाळी मात्र काम चालू कर.
( प्रकरण पाच समाप्त.)