अनुभव -3 ---------->डोळे= Eyes (E)
हिमांशुची रंगत नजरेसमोर विनोदाची पंगत......!
(शंकर-काकाजी जे आमच्याकडे भाड्याने होते खुप वर्षापासनं असल्यामुळे संबंधही घनीष्ट होते.त्यांची पुतणी सुनीता ताई देखील जवळच राहत होती, आणि सुनीता ताईचा 8 वर्षाचे करामती पुत्र हिमांशु.तसा त्याची किर्ती मी शंकर-काकजींच्या मुखातुन ऐकलीच होती.त्यामुळे त्याच विश्र्लेशण करताना खोडकर,करामती शब्द कमीच पडेल ही जाण मला होतीच ,एकदा तर म्हणे हा पट्ठा रागाच्या भरात त्याची स्कुल वी एन सी मधन घरी एकटा आला होता मात्र असो.त्या दिवसाच्या आधी पर्यंत माझा हिमांशु सबोत संपर्क कधीच आला नव्हता मात्र जेव्हा आला तेव्हा आयुष्याचा गमतीदार अनुभव देऊन गेला.)
सप्टेंबरचा शुक्रवारचा तो दिवस होता ,संध्याकाळच्या 5 च्या दरम्यान मी राधा समवेत वर गच्चीवर बसायला जात होतो ,तेच तो हिमांशु वर टेनीस बाँल नी खेळत होता, राधा मुर्ख म्हणाली की हिमांशु मी पण तुझ्या सबोत खेळते,आणि हे दोघेही खेळु लागले आणि हिमांशु त्याच्या किर्तीच्या अगदी विपरीत निरागस मुलासारखा राधासमवेत खेळता होता.माझ्याच मनाची नजर जणु हिमांशुला लागली असावी ज्या योगाने पुढील विपरीत कार्य राधाच्या हातुन घडलं .तसही राधाताई म्हणजे कुठलही काम बिघळवण्यात वस्ताद असलेलं व्यक्तीमत्त्व त्यामुळे यांच्या हाताने बाँल पलीकडच्या घराच्या पलीकडे गेला यात काही नाविण्य नाही,मात्र बाँल काही तुमच्या-माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीच्या नव्हता तर अगदी रागात श़्रेष्टत्व प्राप्त केलेल्या विभुतीचा होता .बाँल खाली जाता क्षणीच हिमांशुने डरकाळी फोडली ज्याने राधा दी वाघीन नाही पण मी नक्की हादरली तो म्हणाला राधा दिदी ये आपने अच्छा नही किया मुझे मेरा बाँल चाहीये ,आता बाँल परत मिळवणं काही शक्य नव्हतं परंतु त्या देडफुट्याचा राग पाहुन आम्हा दोघींना हसु सांभाळत नव्हतं,राधानी मोठ्या असलेच्या फायदा घेत त्याच्या तीरस्कार करत म्हटल उद़्या आणुन देईल तुझा बाँल चल जा आता खाली हे ऐकताच त्याचे चित्त खळवळले आणि त्या छोट्यामध्ये सनी देओल च रक्त संचारू लागल हे मला त्याच्या हाव-भावावरून कळायला वेळ लागला नाही आणि त्याच क्षणी तो छोटासा म्हणतो ती तब तक आप मुझे 55 रूपीस देदो बापरे मला खरच आश्चर्य वाटलं राधानी त्याला रागवत पाठवल .तो खाली तर गेला मात्र त्याच्या करामती डोक्याने पुढचे पाच मिनीट राधाला नरकयातना दिल्यात अस म्हणायला हरकत नाही ,आणि माझे डोळे सुद्धा त्या प्रसंगाची साक्ष देऊन आजही अश्रुहास्य स्वीकारतात. जे घडल त्याला आठवुन मला देखील हिमांशु महाराजांचा जयजयकार करावासा वाटला .तो खाली गेला त्याने आपल्या खेळण्यातला लहान लहान वस्तु जमा करून आणल्यात आणि एक एक करून राधावर वर्षाव केला त्या वस्तुंचा ,रागवल्यावर देखील तो खाली जाऊन जे हाती लागेल ते आणु लागला आणि राधावर धावा बोलु लागला मला हसु तर खुप येत होत मात्र सतत च्या कृतीच्या पुनरावृत्तीने आता मात्र तो खुप वात़्रट वाटु लागला मला आणि राग सुद्धा येऊ लागला शेवटी त्याच्या सर्व वस्तु संपल्यात मला वाटल आता हा येणार नाही अगदी काहीच वेळात तो मोठ्ठा बांबु घेऊन आला बापरे आता सुनीता ताईला सांगण भाग होतं त्याला मी पकडल आणि सुनीता ताई ला आवाज दिला तेवढ्यातच हा महान विभुती अगदी जीवाच्या आकांताने ओरडुन किंचाळुन रडु लागला आम्हीच घाबरलो सगळे जमले घडलेली आपबीती राहली बाजुला आणि त्याने सुरू केलेल नवीन नाटक आटोक्यात घेण्यातच सर्वांच्या नाकी ऩऊ येऊ लागले तो काही शांत बसेना ,आता काय कराव तर राधानीच शरणांगती स्विकारली आणि बाँल विकत घेऊन आणला आणि हिमांशु महाराजाच्या चरणी अर्पण केला .आणि त्यांची ओरडण्याची तपश्चर्या सफल झाली.राधाचा एकच प्रतीसाद अपु काय विचीत्र मुलगा आहे .आणि मी परत हिमांशुकडे पाहलं तर तो वात्रट आम्हाला बाँल दाखवुन चिडवत होता,परंतु त्याच्य त्या बाँल परत मिळवण्याच्या हव्यासातुन मला विचार करायला भाग पाडलं.
आणि मी देखील आता घडलेल्या मुर्ख आणि विनोदात्मक घटनेचा विचार करू लागली .जर आपण एखाद़्या कामात दंग आहोत आणि कुणी दुसऱ्याने जबरदस्तीच संकट निर्माण कराव आता आपण ठरलो मनुष्य प्राणि जो प्रत्येकच संकटाला अवाढव्य मानतो म्हणजे आपण छोट़्या हिमांशु सारखं स्वत:ला मानतो आणि संकट हे जणु मोठ्यांसारख छळत असतं आपल्याला तो मोठेपणाचा रूबाब दाखवतो आणखीनच ऊग्र स्वरूप घेतो आणि आपण हतबल होऊन संकटापुढे शरणांगती पत्करतो .मित्रांनो राधाने बाँल न देण ही हिमांशु साठी निर्माण झालेली समस्याच नव्हती काय? खुप झाल असत तर त्याने आपल्या आई ला नाव संगायला हव होत मात्र त्याने या प्रसंगाला कस सामोरे जाण्याच ठरवल हे तर आपण पाहलच,आपल्या समस्येला त्याने त्रासवुन तर टाकलच मात्र बाँल सुद्धा परत मिळवला. आता हिमांशुच वरील चित्रण आठवा ,सर्वप्रथम त्याने धिटपणे राधाला बाँल मागीतला ,मग उद्धटपणेे पैसे,आणि मग तिच्या नाकी नऊ आणले आणि अखेरीस आपल ब्रम्हास्त्र वापरल ते म्हणजे रडण,एवढ्या मोठ्या प्रक्रीयेनंतर राधा जी त्य पेक्षा बरीच मोठी आहे ती त्या छोट्यास्या डेढफुट्या पुढे साष्टांग शरणांगती पत्करते किती आश्चर्य ना ,आता माझ्या डोक्यात यातुनच विज चमकली की जर आपण देखील आलेल्या समस्येला आधि धीटपणे,मग उद्धटपणे तरीही काही नाही झाल तर त्या समस्येला हैरान करून टाकणे आणि यातुनही काही नाही झाल तर बुद्धीच अखंडीत ब्रम्हस्त्र वापरून त्यावर मात करायची पण हार मानायची नाही अस ठरवल तर कुठल्या समस्येची आपल्या पुढे टिकायची ऐपत आहे काय???? गरज आहे ती प्रत्येक समस्येपुढे हिमांशुसारखी भुमीका घेण्याची नाही का?? गप्प बस अपु राधा ओरडली ,पण तुम्हाला पटल ना.....!!!!!
बापरे हिमांशुच तस ते रूप डोळ्यातुन डोक्यात शिरल आणि एका निराळ्या अनुभवाची भर टाकुन गेल.