Get it on Google Play
Download on the App Store

अनुभव-1 -------> नाक = Nose (N)

गंध, मसाले भात आणि नाक (N).............

Tution वरनं परतले ,सप्टेंबरचा रविवारचा तो दिवस होता उंबरठ्यावर पाय ठेवत नाही तोच मसाले भाताचा घमघामट सुगंध नाकातुन ह्रदयात शिरला व ह्रधीराद्वारे प्रत्येक अंगात भिनभिनु लागला..लगेचच मला सुगावा लागला की आज मातोश्री ने प्रत्येकाच्या मन जींकण्याच्या सामन्यात षटकार मारण्याचं ठरवलय,म्हणजे तसं तर ती नेहमीच साक्षात अन्नपुर्णाच आहे पणं आजची बात जरा न्यारीच होती कारण ताईने स्वयंपाक सांभाळल्या पासनं आई ने मसाले भात केला अस क्वचीतच व्हायचं. मी आई ला म्हटलं अग एवढा घमघमाट सुटल्या-नंतर मला राहवत नाही ,आई म्हणाली अग कडी व्हायची आहे ना चल दही घेऊन ये मी म्हटल मी दोन मीनिटात आणते व मी लगेचच दही आणल. तेव्हाच गँस सिलींडर संपल आईने नवीन सिलींडर लावलं तो पर्यंत कडीची तयारी झाली होती ती गँस वर ठेवायची तेच शेजारच्या निमजे काकुंनी मंदीरात जाण्यसाठी आईला हाक दिली मग आईने  दोन्ही गँस सुरू केल्यात ज्यावर एकीकडे कडी तर दुसरीकडे मसालेभात (ज्याला फार कमी उष्णता हवी होती शिजण्याकरीता ) ठेवला  आणि ताईला व मला एकाच वेळेस म्हटलं की गँस वरच होताच गँस बंद करायची आणि आई निमजे काकुं-समवेत मंदीराच्या दिशेने निघाली. मी अभ्यासाच घेऊन बसले, ताई कपड्यांची आवराआवर करत होती अचानक वातावरणाने ढगांची काळीभोर शाल ओढावली व विजांच्या भयावह स्वरात जणु घोरण सुरू झालं ,ताई तातडीने बाहेर निघुन गाड्यांना आत टाकु लागली ,मी गच्चीवरनं कपडे आणायला पळाली खाली येताच, घरात पाऊल ठेवताच परत नाकाला ऊग्र गंध तर आला मात्र यावेळेस मसाले भाताच्या करपण्याचा तो वास होता,आमच्या पायाखालील जमीन हरवती  ताई मला म्हणु लागली आणि मी तीला  कारण  या भांडणात आम्हाला साफ माहीती होत की कोणी एकाने जर याची जवाबदारी घेतली नाही तर आईचा रणरागीणीचं स्वरूपाचा परिणाम दोघांवरही होईल..आणि तसच झाल देखील मसाले भाताच्या सुगंधाच्या स्तुतीने आनंदीत आई आता चंडीका बनली होती जीचा कोप आमच्यावर झालाच .आणि चव न घेतलेल्या त्या मसाले भाताच्या सुगंधाच्या आठवणीने आजही उंदीर उदर भित्तीवर वार करत असतात...

य़ा प्रसंगावर जरा मार्मीकपणे विचार करू लागली , यातुन  आपल्याला काय लाभ होईल यावर आता लक्ष केंद्रीत करू लागली.यात माझ्या आईची जी भुमीका आहे ती आपल्या सर्वांचं प्रतीनिधीत्त्व करते ,एक काम हातात घेतल्यावर त्याला योग्य-रितीने पारपाडण्यासाठी त्या कामाबद़्दलची आवड,त्यासाठी लागणाऱ्या सामग्री जमवण्यासाठी केले जाणारी धडपड,पुर्ण करण्याची तन्मयता,जीद़्द,आणि काम पुर्ण पणे फुलण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्टा हे सर्व गुणांची आईने अंमलबजावणी केली म्हणजे तुमच्या-माझ्या मते आता यश100% पक्क  झालय , कारण आईने आपल्या गुणांना  घटक स्वरूपात वापरलं व  प्रयत्नांच्या पराकाष्टतेची योग्य शेगडी ही देऊन समतोलाचा सुगंध  दिला आता तर यश नावाचा भात हमखास तयार होणार होता ....पन काय झाल ????

आता दुसरा भाग ,मी आणि ताई हे  आपल्या सर्वांतील यशाला बाधक ठरलेल्या त्या एकमेव गुणाच प्रतीनिधीत्त्व करतोय,तो गुण म्हणजे?????निष्काळजीपणा..... सर्व योग्य झाल असताना केवळ छोटासा निष्काळजीपणा हा यशापासुन दुरावतो..आता यातील वेगवेगळ्या परिस्थिती ,वातावरणातील बदल वगैरे वगैरे आपल्याला हेच सांगतात की तो निष्काळजीपणा भलेही आपण नकळत केला अथवा झाला मात्र या गोष्टीमुळे परिणाम बदलणार नाही भात करपेलच मग या निष्काळजीपणाला लक्षपुर्वकता या गुणानी आपल्यााला विस्थापीत कराव लागेल..मग मला खात्री आहे की परिस्थीती चा प्रभाव आपल्या कर्तुत्त्वाला पराजीत करण्यास असमर्थ ठरेल...... .!!!!

कारट्यांनो भातावर लक्ष द़्यायला सांगीतल ते नाही झाल खा आता तोच करपलेला भात आई ओरडली......आणि वैचारीक जगातुन वास्तविकतेत प्रवेश केला ,लाजीरवाण्या मुखाने मुकाटपणे आईच प्रवचन ऐकत करपलेला भात खाल्ला ,त्या भाताच्या सुगंधात व करपलेल्या भाताच्या दुर्गंधात यशाच लपलेल रहस्याच ज्ञान मला नाक या इंद्रीयाने दिलय म्हनुन हा अनुभव डोक्याला नाही तर नाकाला समर्पीत करते ...हसु नका !!! धन्यवाद

लक्षपुर्वकता --------> यश ---------> निष्काळजीपणा -----------> अपयश