अनुभव-2 ----------> कान=Ear (E)
भुरूच भुंकणं........
सप्टेंबरच्याशनिवारची ती दुपार होती ,घरी आई,बाबा,ताई ,दादा सर्वजन वेगवेगळ्या कारणांनी घराबाहेर पडले होते.आता अख्खी दुपार मला खायला उठत होती.टि.व्ही देखील मनोरंजन करण्यास असमर्थ वाटु लागली.मग स्वयंपाक-घराच्या पुढे वरच्या भागाला असलेला सज्जा मला माझ्या एकोप्याचा मित्र वाटु लागला.खुर्ची च्या साहाय्याने तो गाठला,दहावी पर्यंत प्रत्येक सुट्टीत मी तीथे घालवलेला वेळ आठवुन ,आणि जोपासलेल्या छंदांची प्रती पाहताना अलगदच गुदगुदल्या होऊ लागल्या एवढ्या सर्व वातावरणात मी गुंग असताना माझ्या कानाने जोरात ह्रदयाच दार ठोठावल आणि मी दचकले,कुत्रा भुंकण्याचा तो आवाज होता व त्या आवाजाच्या दिशेने मी सज्ज्यावरून पाहायला सज्ज झाले.कुत्र्याला पाहताच मला लक्षात आल की तो कुत्रा राऊत आई कडला भुरू होता ज्याच्या मला खुप राग येतोच तो उगाचच येणाऱ्या जाणाऱ्या वर भुंकत असतो एकदा ताईला तर त्याने नखही मारल होत,पण अनेक चोरांना पकडुन देणारा लक्षात घेऊन मी त्याचा अगाऊपणा पचवायची .पण हा भुरू सतत टिनेच्या कुंपनाकडे पाहुन का भुंकत आहे हे मला कळेना ,तो अगदी सतत भुंकत होता मला वाटल चोर तर नसेल लपला ना? अगदी त्याच क्षणी छोट्या फटीतुन मांजरेचेऱ्या पीलाने डोकावले तशी भुरूने परत सिंहासारखी डरकाळी फोडली व बिचार पिल्लु परत घाबरल,व माझ्या ह्रदयाची स्पंदन वाढली पण त्या क्षणाला मी केवळ त्या प्रसंगाला पाहण्याचे ठरवले का ठरवले हे माझ मला देखील समजले नाही ..मला आईचे सकाळचे शब्द आठवले की गेल्या काही दिवसापासनं चार पाच घराच्या मागच्या बाजुला मांजर मेलेल्या दिसल्या ,मला कळायला वेळ लागला नाही की हा उपद्रव मेल्या भुरूचाच असणार आता काय हा या पिल्लुला देखील मारणार या विचाराने माझ मन हादरलं ...त्या पिल्लुची भिती,भुरूचे क्रुरपण दोन्हीही मी अनुभवत होते .परिस्थीतीचा सुगावा घेताच मला दिसले की जर जीव वाचवायचा आहे तर त्या माजरीच्या पिल्लुला केवळ तीन पाय चालायचे होते तर ती बाजुच्या घरच्या दाराच्या फटीतुन आतमध्ये प्रवेश करून जीव वाचवु शकत होती .मात्र मध्ये होता तो भुरू मी जो सतत भुंकत होता त्याला दगड मारून मी एका क्षणात तीला वाचवु शकली असती मात्र मला त्या पिल्लाचे प्रयत्न पाहावयाचे होते .गेल्या 15 मिनीटापासुन हा क्रम मी पाहत होते ,आता मनाशी ठरवल की पुढील पाच मिनीटाच्या अंतराने त्या पिल्लाची मी मदत करेल भुरू ला दगड मारून फेकेल पण पाच मिनीटातील दहा सेकंदात जे घडलं त्याला साक्ष केवळ माझ्या इंद्रीयांनी दिली त्या घटनेवर माझाही विश्वास बसत नाही ती दहा सेकंदाची घटना म्हणजे भुरूच सतत भुंकन सुरू होत विरूद्ध दिशेला असलेल्या झाडावरून एका खारूताई उतरली आणि रोडवरून तुरू तुरू धावत सुटली व तो अगाऊ भुरू तिच्या मागावर लागला आणि हाच डाव पाहत त्या पिल्लुने देखील दाराच्या फटीतुन बाजुच्या घरात प्रवेश केला ,व खारूताई बाजुच्या घराच्या भिंतीवरून वर पिल्लर वर चढली ...व नंतर त्या पिल्लुने नजरेचा कटाक्ष खारूताईवर टाकला जनू तो आभार मानत होता आणि खारू ताई देखील शेपटीला हलवत त्याच आभार स्विकारत होती ...
बापरे म्हणजे प्रकृती खरच उत्तम गुरू आहे म्हणजे केवळ 20 मिनीटाच्या वेळेत तिन्हे मला केवढी महत्त्वपुर्ण गोष्ट समजावली ..दहा सेकंदाच्या कृतीवर मी सलग तास भर विचार करू लागली ,विरूद्ध बाजुला जाण्याच कारण मस्ताना खारूताई गेली आणि त्या पिल्लुला मदद केली. माणसाच्या वाढत्या काँक्रीटच्या जंगलात ,भावनेच्या बाजारात मदत हा शब्दच लाखो मील दुरावतो मग ती करण्याची भुमीका कोण घेईल??? आम्ही केवळ स्वकेंद्रीत झालेलं असताना निसर्गातील घटक आम्हाला परोपकाराच द्यान देऊन जातो .खरच आज समाजात प्रत्येकातील माणुसकी जागी करण्यासाठी प्रत्येकाने एकमेकांना खारूताई सारखी मदत करावी लागेल.खारूताई बद्दल तर मनात आदर वाढलाच व तीला ताई का बर म्हणत असाव हेही मला लक्षात आल ...मित्रांनो मला अस वाटतं की समाजात खुप काही क्रांती प्रबोधन घडवुन नाही आणता आल तरी चालेल पण प्रत्येकाने केवळ खारूताईच ह्रदय अंगीकाराव व केवळ दहा सेकंदाची मदत करण्याची भुमीका प्रत्येकाने ठेवावी .
आज तर पिल्लाला मी मदत करणारच होते पण हुशार खारूताईने पुढाकार घेऊन माझ श्रेय घेतल एवढ्यात भुरु परत भुंकला जनु मला म्हणत होता मोठी आली मदत करणारी......भुरूच्या भुंकण्याने कानाने ह्रदयाच दार ठोठावल व त्यान डोक्याल विचारांची कलम चालवण्यास प्रतीबद्ध केल म्हणुन हा अनुभव कानाला समर्पीत.....धन्यवाद!!!!