Get it on Google Play
Download on the App Store

अनुभव N-E-E-T-S चे

(N-ose,E-ar,E-yes,T-ongue,S-kin)

शीर्षक पाहुन जरा गैरसमज होतो,मात्र घडणाऱ्या घटनांना इंद्रियांच्या मदतीने समजण्यामुळे बुद्धीला अनुभवाची निराळी समज य़ेते जी आयुष्याला कलाटणी देण्यासही कामास येते या समजेतुन हे शीर्षक मला द़्यावासा वाटलं. खरच आपले इंद्रीये बुद्धीचे द्वार असतात,आता जर विचार करा की अगदी भव्यदिव्य वातानुकुलीत ,सर्व सुखसोईने लुप्त, राजवाड्यासारख घर आपल्याला मिळाल मात्र त्याला चहुबाजुंनी केवळ भिंती आहेत आतमध्ये प्रवेशासाठी द्वार नाहीत मग त्या वास्तुचं महत्त्व तुमच्या माझ्या मते शुल्लकच आहे न,तसच जर मानवी जन्म घेतला तर मेंदु नावाचा बौद्धीक सोयीने लुप्त विशाल कार्यात्मक स्वरूप असलेली वास्तु आपल्या सर्वांना मिळालेली आहेच पण जर इंद्रीयांचे द्वार नसते तर???? . यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकी घटनेवर विचार केला जातो ,ज्यात बऱ्याच वैचारीक आणि भावनिक स्तरावरच्यागोष्टी असतात. ज्यातुन आपलेच विचार आपल्याला शुद्ध करतात तेही शुद्धीकरणाची RO(rethinking  on)  पद्धत वापरून..!अश्याच गंमतदार ,रंगतदार,विनोदात्मक,विडंबनात्मक, वैचारीक प्रसंगांना वास्तविकतेचा गाभा ठेवुन व काल्पन्कतेची चमक देऊन लिहण्याचा छोटासा  प्रयत्न केलाय.प्रत्येक प्रसंगाला बुद्धीच विशेष आकर्षण ओढणाऱ्या इंद्रीयाला तेथुन मिळणाऱ्या अनुभवाचं प्राधान्य दिलय.....!