अपेक्षांची चिता
स्वार्थ या मनाचा साधणार मी कधी,
तुला मनातलं सारं सांगणार मी कधी.
उपकार न कोणाचे असे हक्क तो माझा,
माझं जे सर्वस्वी ते मिळणार मज कधी.
कोड्यात मन हे माझं, पण ओढ अंतरीची.
तुला कधी न कळली साधं या मनाची.
संपणार सारेच जणू सोबतीचं माझ्या,
मग अपेक्षांची चिता जळणार ती कधी.