Get it on Google Play
Download on the App Store

प्रेम चित्र

मला,

काढता येईल का ते चित्र,
हृदयाच्या कुपीत लपलेल,
तुझ्या भाबड्या डोळ्यांमधे,
थोडस प्रेमाने जपलेल....


भरता येईल का तो रंग,
सप्त रंगांच्या जोडीचा,
पण त्यालाही सर नसावा 
तुझ्या हसण्याच्या गोडीचा....


रेखाटता येईल का ती अदा,
बेधुंद पणे बागडणारी...
उददीच्या गांभीर्यातही,
सरीतेप्रमाणे खळखळनारी...

अशीच खरी आहेस का तु ...??
फुलांप्रमाणे निर्मळ, 
कि नुसताच भास मनाचा 
जणू उन्हातील मृगजळ...

काढता येईल का हे चित्र....