Get it on Google Play
Download on the App Store

सखी सोबती

काल पडलं एक स्वप्न,

त्या स्वप्नात दिसलीस तु...

विचारलं कोण आहेस

हे ऐकुण फक्त हसलीस तु...

 

पुन्हा म्हणालीस ठरव तुच, 

काय तुझा माझा संबंध... 

कसा जुळवशील तुझ्या माझ्यातील,

हा ऋणानुबंध...

 

तुझ्या माझ्या नात्याला

नाव असायलाच पाहिजे का...

तुझ्या बद्दल आदर वाटतो 

तो दिसायलाच पाहिजे का... 

 

तरिही जरी कोणी विचरलच मला..

मैत्रीण आहे म्हणता येइल...

मैत्रीच्या पलीकडली 

सखी सोबती म्हणता येईल...