Android app on Google Play

 

सात वृध्दिकारक धर्म खालीलप्रमाणे

 

१. जेव्हापर्यंत वज्जी ( Vajji ) अखंडपणे एकत्र जमत राहतील, विशाल संख्येने ऐक्य राखतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल, र्‍हास होणार नाही.

२. जेव्हापर्यंत ते एकत्र जमत राहतील, एकजुटीने बैठकीतून उठतील, आणि एकजुटीने वज्जींच्या प्रजेच्या प्रती त्यांची असलेली सर्व कर्तव्ये पूर्ण करतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्‍हास होणार नाही..

३. जेव्हापर्यंत ते कायदा म्हणून न ठरविलेल्या गोष्टींना कायदा म्हणून अमलात आणणार नाहीत, कायदा म्हणून ठरविण्यात आलेल्या गोष्टी मोडणार नाहीत, आणि पूर्व परंपरेने ठरविलेल्या कायद्या प्रमाणे वागतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्‍हास होणार नाही.

४. जेव्हापर्यंत वडिलधार्‍या लोकांचा ते मान राखतील आणि त्यांचा सल्ला ते नेहमी ऐकतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्‍हास होणार नाही.

५. जेव्हापर्यंत महिलांना आणि तरुणींना जबरदस्तीने आणून आपल्या घरामध्ये ठेवणार नाहीत, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्‍हास होणार नाही.

६. जेव्हापर्यंत ते गावात असलेल्या किंवा गावाबाहेरच्या चैत्यांचा गौरव करतील व सर्व धर्म कर्तव्ये पार पाडतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्‍हास होणार नाही.

७. जोपर्यंत ते अर्हन्तांचे रक्षण करतील, त्यांच्या राज्यात अर्हंत सुखात राहतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्‍हास होणार नाही.