Get it on Google Play
Download on the App Store

संत जनाबाई परिचय

संत जनाबाईने आपल्या अभंगांची नावे 'दासी जनी', 'नामयाची दासी' आणि 'जनी नामयाची' अशी ठेवली आहेत. ती मुळात नामदेवाच्या घरी दासी म्हणून कशी आली? याबद्दलची माहिती अगदी दहाबाराओळीतच सांगण्यासारखी आहे. पण या दासीपणाची, स्वत:च्या शूद जातीची आणि इतकेच नव्हे, तर स्वत:च्या 'स्त्री'पणाचीही जाणीव व्यक्त करणारे अनेक अभंग तिच्या मनातून तिच्या शब्दांत उमटले आहेत आणि विठ्ठलाला मायबाप आणि प्रसंगी सखा, जिवाचा मैतर समजणाऱ्या जनीने विठ्ठलाशी त्याबद्दल संवाद साधलेला तिच्या अनेक हृद्य अभंगांतून दिसतो.

गंगाखेड नावाच्या गावात राहणाऱ्या, 'दमा' नावाच्या एका शूद जातीच्या भक्ताची, जनाबाई ही मुलगी. या तिच्या जातीबद्दलचा उल्लेख तिच्या अनेक अभंगांतून तिने स्वत: केलेला आहे. जनाबाई पाच वर्षांची असतानाच तिची आई मेली. दमाला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्या दृष्टान्तानुसार, विठ्ठलभक्त असणार्‍या, पंढरपुरात वास्तव्य करणार्‍या, शिंपी जातीच्या दामाशेट्टींकडे आपल्या चिमुरड्या जनीला सोडून दमा निघून गेला. दामाशेट्टींचं सगळंच कुटुंब भगवद्भक्त होतं. पंढरपूरच्या केशिराजाची पूजा त्यांच्याकडे चालत असे. त्यांचा मुलगा नामदेव हा तर इतका विठ्ठलवेडा होता की तो विठ्ठलाला आपला मित्रसखाच मानत असे.

अशा नामदेवाच्या कुटुंबात जनाबाई आश्रित म्हणून राहिली. जनीची आई आधीच देवाघरी गेलेली आणि आता सख्खा बापही देवदेव करीत निघून गेलेला. या अनाथतेची जाणीवही जनाबाईच्या अभंगांत ठायी-ठायी व्यक्त झाली आहे. ''आई मेली बाप मेला। मज सांभाळी विठ्ठला॥ हरि रे मज कोणी नाही। माझी खात (खाजत) असे डोई॥ विठ्ठल म्हणे रुक्मिणी। माझे जनीला नाही कोणी॥ हाती घेऊनी तेलफणी। केस विंचरुनी घाली वेणी॥'' असा कल्पनेतला संवाद जनी विठ्ठलाशी करते. सर्वांचा सखा असणार्‍या नियंत्यापाशी मायेचा आधार शोधण्याची मानसिकता या अभंगात आहे.

तेव्हा आश्रित म्हणून असली तरी, जनाबाई दामाशेट्टीच्या कुटुंबापैकीच एक झाली होती. तिच्यावर जेव्हा विठ्ठलाचा हार चोरण्याचा आळ आला, तेव्हा पंढरपूरच्या देवळातले बडवेदेखील तिला म्हणतात, ''अगे शिंपियाचे जनी। नेले पदक दे आणोनी॥''

नामदेवाच्या घरात वावरताना त्या दासीचे जग ते केव्हढे असणार? अंगण, परसू, माजघर, कोठार एव्हढ्याच सीमेत ती वावरत असणार. पण शरीराने इतक्या सीमित जागेत वावरणारी जनी मनानं मात्र असीम अशा परमात्म्याला पहात होती. त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तुळशीवृंदावन, अंगण, रांजण, जातं, शेणी वेचायला जाण्याचं रान अशा स्थळांचे तिच्या अभंगांत उल्लेख आहेत आणि त्या सर्व जागांवर देव तिचा सांगाती आहे. तो कोठीखोलीत तिला दळू लागतो, रानात शेण्या वेचू लागतो, अंगणात सडा घालू लागतो. अशा घराच्या सीमेतच तो अनंत, असीम परमेश्वर ती बघते. घरातल्या घरात कष्टाची, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने ही आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.

गेल्या जन्मीचे संचित, दामाशेट्टींकडचे भक्तीचे वातावरण आणि नामदेवादिक संतांचे आध्यात्मिक संस्कार या सर्वांमुळे भक्त असणार्‍या दासीजनीची 'संत जनाबाई' झाली.

ती एका अभंगात म्हणते,

'' वामसव्य दोहींकडे। दिसे कृष्णाचे रूपडे।

वरतीखाली पाहू जरी। चहूकडे दिसे हरी।

सर्वांठायी पूर्णकळा। जनी दासी पाहे डोळां॥

असा सर्वत्र परमेश्वर दिसेल इतके तिचे मन:चक्षू विशाल झाले आहेत. परमात्म्याची 'पूर्णकळा' तिनं जाणलेली आहे. अभंगात पूर्णकळा हा शब्द वापरून सगळ्या उपनिषदांचं तत्त्वज्ञान तिनं एका शब्दात सांगितले आहे.

Janabai was born in a Maharashtra village to a family of the lowest, sudra, caste. When she was a young child, her mother died and her father (shortly before his own death) took her to the city of Pandharpur, where she became a servant in the household of Varkari devotees of Vitthal, an incarnation of Vishnu. A son of the family, Namdev, became one of the chief Varkari poets, writing in vernacular Marathi and teaching equality of all, regardless of caste or gender, before God. Janabai cared for the young Namdev and remained his servant, his dasi, throughout her life. Tradition says that they died on the same day.

Janabai composed over 340 devotional songs, abhangs; they survived by being included in collections of Namdev's own works. Some of Janabai's songs tell of the lives of her fellow Varkari and of the various incarnations of Vishnu, but the most distinctive are those that tell of her personal relationship with the god Vitthal. Janabai seldom speaks of erotic desire for the god (as some of the other bhakta poets do); she more often sees Vitthal as her mother (a view not uncommon among the Varkaris), but also as her fellow-serving maid, and ultimately herself.