संतचरणीं नरहरी लोळे
सिक्का जयाचा आहे थोर । हातीं पताकांचा भार ॥ १ ॥
भजन होय स्थळोस्थळीं । अवघी संत हे मंडळी ॥ २ ॥
वैकुंठीची खूण । रणखांब आहे जाण ॥ ३ ॥
खांबासी भेटती जन । शिळेवरी लोळे जाण ॥ ४ ॥
पापतापही जळाले । संतचरणीं नरहरी लोळे ॥ ५ ॥