नरहरीसी पंथ दाखविला
अनुहात ध्वनी करित निशिदिनीं । मन हें लुब्धुनी गेलें तया ॥ १ ॥
अखंड हें मनीं स्मरा चिंतामणी । ह्रदयीं हो ध्यानीं सर्वकाळ ॥ २ ॥
अखंड हें खेळें जपे सर्व काळीं । ह्रदयकमळीं आनंदला ॥ ३ ॥
प्रेम अखंडित निशिदिनीं ध्यात । नरहरीसी पंथ दाखविला ॥ ४ ॥