नरहरी ह्मणे शेवटीं
देह जन्मला व्यर्थ । झाले पापांचे पर्वत ॥ १ ॥
दान धर्म नाहीं केला । शेवटीं जन्म व्यर्थ गेला ॥ २ ॥
देह अवघा क्षणभंगुर । दिसे स्वप्नवत् सार ॥ ३ ॥
नरहरी ह्मणे शेवटीं । संगें न येई लंगोटी ॥ ४ ॥