Get it on Google Play
Download on the App Store

बुद्ध जयंतीचे प्रणेते

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील/प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली.

१९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस १९५३ पासून सुरुवात केली. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरूवात बाबासाहेब आंबेडकर केली, म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात.

'इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या.' अशी आग्रही मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.

बाबासाहेब अांबेडकर

अमित
Chapters
बाबासाहेब अांबेडकर सुरुवातीचे जीवन उच्च शिक्षण कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन जातिसंस्था विषयक सिद्धान्त वकिली अस्पृश्यतेचा विरोध महाडचा सत्याग्रह बहिष्कृत हितकारिणी सभा मनुस्मृतीचे दहन मनुस्मृती दहन अंबादेवी मंदिर सत्याग्रह पर्वती मंदिर सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह कृषी व शेती संबंधीचे विचार शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभाग व खोती पद्धतीवर बंदी गोलमेज परिषद पुणे करार स्वतंत्र मजूर पक्ष 'बाबासाहेब' उपाधी राजकीय कार्य बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना दलित शिक्षणसंस्थेची स्थापना पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना स्त्रियांसाठी कार्य स्वातंत्र्य लढा धर्मांतराची घोषणा धर्मविषयक दृष्टिकोन व धर्मचिकित्सा हिंदू कोड बिल भारतीय स्वातंत्र्याविषयी विचार दुसरा विवाह संविधानाची निर्मिती आर्थिक नियोजन रिझर्व बँक ऑफ इंडिया बुद्ध जयंतीचे प्रणेते बौद्ध धम्मात धर्मांतर महापरिनिर्वाण पत्रकारिता मानध पदव्या वारसा प्रेरणादायी आंबेडकर प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी भारतीय समाजावरील प्रभाव लोकप्रिय संस्कृतीमध्ये