Get it on Google Play
Download on the App Store

व्रते

व्रत म्हणजे व्रतवैकल्ये! वैकल्यांचा अर्थ विकलता ! म्हणजे बारीक होणे. स्वार्थ व परमार्थ साधणारे हे व्रत आहे .

सोमवार- श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे.नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

मंगळवार-नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात.

बुधवार- बुधाची पूजा

गुरुवार- बृहस्पती पूजा

शुक्रवार - जिवती देवीचे पूजन , पुरणाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे,आणि हळदी-कुंकू करण्याचीही प्रथा आहे.

शनिवार- ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन

रविवार- आदित्य राणूबाई पूजन

सत्यनारायण पूजा - श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची पद्धती गेल्या काही वर्षांपासून प्रचलित झालेली आहे असे दिसून येते.

दान- श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ मास मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत ब्राह्मणांना व गोर गरिबांना भोजन देतात.देवस्थानातही या महिन्यात कथापुराणादी कार्यक्रम ठेवतात.

कावड नेणे- उत्तर भारतात विशेषतः बिहार मधील वैजनाथ या ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या शिवमंदिरात गंगेचे पाणी कावडीतून वाहून नेऊन शिवपिंडीला अभिषेक करण्याची परंपरा प्रचलित आहे.