पाऊस चारोळी
निमिष सोनार
आठवणींचा पाऊस
पूर्वी तू जवळ असतांना ओला चिंब करायचा
मला तुझ्या प्रेमाचा पाऊस!
आज तू दूर असतांना अश्रूंनी चिंब करतोय
मला तुझ्या आठवणींचा पाऊस!
पावसा पावसा
पावसा पावसा पडलास तू आकाशभर
तळं साचवलंस तू अंगणभर
मनस्वीपणे कोसळलास तू मुसळधार
ओसाड मनाला केलंस तू हिरवंगार