नागपंचमी ३२ शिराळा...
आशिष अरुण कर्ले
चिखलवाडी, ३२ शिराळा (सांगली)
९७६५२६२९२६
श्रावण महिना हा निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो विविध सण उत्सवांसाठीही प्रसिद्ध आहे...
शेतातील पेरणी संपल्यानंतर शेतात आलेल्या डौलदार पिकाकडे पाहून निसर्ग, प्राणीमित्र ,भगवंत,संत मंडळी,देवी-देवता यांना आभार मानण्यासाठी, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पर्वणी असते...
श्रावण महिन्याच्या आगमनाबरो येणार पहिला वहिला सण म्हणजे नागपंचमी! नागपंचमीला नागाची पूजा केली जाते महाराष्ट्रात सर्वत्र मातीचा नाग अथवा नागाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते पण सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा या गावी मात्र जिवंत नागाची पूजा केली जाते ही परंपरा महायोगी गुरुगोरक्षनाथ महाराजांनी सुरू केली आहे तेंव्हा पासून ही परंपरा चालू आहे. नागपंचमी साठी शिराळा सर्वत्र प्रसिद्ध आहे.
शिराळ्यामध्ये नागपंचमीची तयारी ही एक महिना अगोदरपासूनच सुरू होते...गावकरी आणि आजूबाजूच्या गावातील लोक नाग पकडायला सुरूवात करतात हे पकडलेले नाग गाडग्यामध्ये ठेवतात शिरळ्यातील लोक हे नागाची काळजी आपल्या मुलाप्रमाणे घेतात काही लोकांचा गैरसमज आहे की नाग दूध पितो पण हे खरे नाही नाग दूध पित नाही...नागाला खाण्यासाठी बेडूक उंदीर असे खाद्य गोळा केले जाते...नागपंचमीला या नागाची घरोघरी, आंबाबाई मंदिरात पूजा केली जाते, गाडे काढून मिरवणूक निघते आशा प्रकारे नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो...
नागपंचमी ३२ शिराळा इतिहास
गोरक्षनाथांनी शिराळयात जिवंत नागाची पूजा सुरु केली ही माहिती नाथलीलामृत ग्रंथात आढळते.
शिराळा गावामध्ये गोरक्षनाथांचे प्राचीन मंदिर आहे.गोरक्षनाथ महाराज भिक्षा मागत गावामधून जात असताना ते गावातील महाजन यांच्या घरी गेले असता तिथे त्यांनी पहिले कि त्यांच्या घरी नागाच्या प्रतिमेची पूजा चालू होती, तेव्हा नाथांनी त्यांना प्रश्न केला " जर जिवंत नाग पाहिलास तर त्याची अशीच मनोभावे पूजा करणार का?", त्यावर त्या महिलेनी "हो" म्हणून सांगितले आणि पाहतात तर खरोखर त्यांच्या घरी जिवंत नाग खेळत होते. त्यावेळी तेथे कोतवाल घरातील शेतकरी होते त्यांनी प्रत्येक वर्षी नाग पकडून पूजेला नागपंचमी दिवशी घेऊन येतील असे सांगितले तेव्हापासून अखंड अशा स्वरूपात जिवंत नागाची पूजा शिराळा गावामध्ये केली जाते...
नागदेवतेची पूजा ही केवळ परंपरा म्हणून नाही तर सुरूवातीपासूनच शास्त्रीय दृष्टिकोनातून पूर्ण श्रद्धेने नागपूजा केली जाते व जिवंत नागाची पूजा ही परंपरा संस्कृती आजपर्यंत जपलेली आहे...नाग दूध पित नाही त्याला बेडूक, उंदीर हे खाद्य दिलं जात, आजूबाजूच्या गावात कुठेही नाग दिसला तर त्याला मारले जात नाही शिराळ्यातील व आजूबाजूच्या गावातील मंडळी नागाला पकडून रानात सोडतात...नागपंचमी होईपर्यंत नागांची भक्तिभावाने पूजा केली जाते त्यांची मुलाप्रमाणे काळजी घेतली जाते व नागपंचमी झाल्यावर त्यांना परत रानात सोडले होते...अशा प्रकारे नागपंचमीमुळे केवळ आपली संस्कृती आणि परंपराच जपली जाते असं नाही तर नागांचे संरक्षण देखील होते...
मात्र काही वन्यप्रेमी संघटनांनी कोर्टात याचिका दाखल केल्याने आज ही ३२ शिरळ्यातील नागपंचमी कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे...आज अनेक कायद्यांमुळे आपले अनेक सण उत्सव बंद होत आहेत...ही खूप मोठी शोकांतिका आहे...