Get it on Google Play
Download on the App Store

गहिरा श्रावण

उदय सुधाकर जडिये
पिंपरी, पुणे
मोबाईल: ९५५२६२६४९६
 
गहिऱ्या श्रावणात
ओलेचिंब आसमंत
कडाडते सौदामिनी
गर्दसावळ्या मेघांतून

पाऊस हिरव्या पानांवर
टपोरे थेंब फुलांवर
ओले पक्षी फांदीवर
अवघे तरंग पाण्यावर

इंद्रधनुष्य क्षितीजावर
हिरवे मोती गवतावर
रिमझिम पाऊस
ओल्या छत्रीवर

धुंद गीत ओठांवर
शहारे तनामनावर
तरुणाई थिरकते
फेसाळ धबधब्यावर