Get it on Google Play
Download on the App Store

श्रीआनंद - भूपाळी ५

अज्ञान निशितमें मज ग्रासिलें माये । कामक्रोध निशाचरीं घाला घातला पाहे ॥
दीर्घस्वप्नें अजगरें सर्व ग्रास केला आहे । जन्ममरण दु:ख तेणें भोगीत जाये ॥१॥
तेणें दु:खें तळमळितां उसणतू आहे । तंव सद्‌गुरुराजें कृपाकरें थोपटिला पाहे ॥
सावध करुनी दयाळूनें दाखविले पाये । तेणें छेंदें मिठी देऊनी श्रीगुरुनाम स्मरताहे ॥२॥
श्रीराम जयराम जयजयराम म्हणताहे । अहोरात्रीं हाचि छंद धरुनी राहे ॥
पावला पावला माझा स्वामी जगजेठी । पायीं लोळे सदा स्मरे घालूनि मिठी ॥३॥
परब्रम्हा दयाळूने स्वरूप दिलें । अनादि भ्रांती छेदूनी मजला सावध केलें ॥
अनंत जन्मांतरिचें लहर गेले । अनंत सुख देउनि मजला अनंत केलें ॥४॥
पतित पावन दीनोद्धारण ब्रीद मिरविलें । अनंत पोवाडे वर्णू किती कृतकृत्य पै केलें ॥
आनंदमूर्तीं कृपा बालक - नाम ठेविलें । श्रीगुरुराम पदीं मी वो अख्ड लोळे ॥५॥

श्रीआनंद - चरितामृत

भगवान दादा
Chapters
श्रीआनंद - अध्याय पहिला श्रीआनंद - अध्याय दुसरा श्रीआनंद - अध्याय तिसरा श्रीआनंद - अध्याय चवथा श्रीआनंद - अध्याय पांचवा श्रीआनंद - अध्याय सहावा श्रीआनंद - अध्याय सातवा श्रीआनंद - अध्याय आठवा श्रीआनंद - अध्याय नववा श्रीआनंद - अध्याय दहावा श्रीआनंद - अध्याय अकरावा श्रीआनंद - अध्याय बारावा श्रीआनंद - अध्याय तेरावा श्रीआनंद - अध्याय चवदावा श्रीआनंद - अध्याय पंधरावा श्रीआनंद - अध्याय सोळावा श्रीआनंद - ओव्या श्रीआनंद - निर्याणाचे श्लोक श्रीआनंद - पद १ श्रीआनंद - पद २ श्रीआनंद - अभंग श्रीआनंद - भूपाळी १ श्रीआनंद - भूपाळी २ श्रीआनंद - भूपाळी ३ श्रीआनंद - भूपाळी ४ श्रीआनंद - भूपाळी ५ श्रीआनंद - भूपाळी ६ श्रीआनंद - स्फुट पदे श्रीआनंद - विशेष