Get it on Google Play
Download on the App Store

श्रीआनंद - भूपाळी ४

स्वानुभवें प्रबोधकाळीं सद्‌गुभानू निर्विकारी । परब्रम्हा अविनाश तेजी प्रगटलें भारी ॥१॥
उठि उठि रे शुद्ध जिवा स्वरूपीं सावध होई । अज्ञानरात्नी निरसुनी स्वयें राघव ध्यायी ॥२॥
सद्‌गुरुचें ध्यान पूर्णब्रम्हा चैतन्य । सच्चिदानंदतनू श्रीगुरु रामनिधान ॥३॥
निष्काम हौनी कामुक फळ हें त्यागुनी । अखंड राघव ध्यायी निर्विशेष मनिं ॥४॥
ध्यान तूं करिसी भ्रमर - कीटक - न्यायीं । भवभय निरसुनी स्वरूपसाक्षी तूं होई ॥५॥
ध्यानीं मनीं स्वप्नीं सदा बोधरूप तूं मानीं । अनंत सुखदु:ख द्वंद्व माया अविद्या निरसोनी ॥६॥
अखंडे तार अखंडे जागृती स्पप्न सुषुप्ती । सद्‌गुरूप्रसादें परब्रम्हा तूं होशी निश्चिती ॥७॥
सद्‌गुरु श्रीरामराजें कौतुक केलें, थोर कौतुक केलें । जीवासि जिवें मारुनी स्वयं पायीं ठेविलें ॥८॥
तें सुख सांगू कोणा श्रुति नेति शब्देंसी । लवण समुद्रा अंत घेऊं गेलें समरसी ॥९॥
ऐसाचि अनुभव केला श्रीगुरुरामें । माझ्या सद्‌गुरु श्रीरामें । आनंदा स्वानंदनिजसुख दीधलें प्रेमें ॥१०॥

श्रीआनंद - चरितामृत

भगवान दादा
Chapters
श्रीआनंद - अध्याय पहिला श्रीआनंद - अध्याय दुसरा श्रीआनंद - अध्याय तिसरा श्रीआनंद - अध्याय चवथा श्रीआनंद - अध्याय पांचवा श्रीआनंद - अध्याय सहावा श्रीआनंद - अध्याय सातवा श्रीआनंद - अध्याय आठवा श्रीआनंद - अध्याय नववा श्रीआनंद - अध्याय दहावा श्रीआनंद - अध्याय अकरावा श्रीआनंद - अध्याय बारावा श्रीआनंद - अध्याय तेरावा श्रीआनंद - अध्याय चवदावा श्रीआनंद - अध्याय पंधरावा श्रीआनंद - अध्याय सोळावा श्रीआनंद - ओव्या श्रीआनंद - निर्याणाचे श्लोक श्रीआनंद - पद १ श्रीआनंद - पद २ श्रीआनंद - अभंग श्रीआनंद - भूपाळी १ श्रीआनंद - भूपाळी २ श्रीआनंद - भूपाळी ३ श्रीआनंद - भूपाळी ४ श्रीआनंद - भूपाळी ५ श्रीआनंद - भूपाळी ६ श्रीआनंद - स्फुट पदे श्रीआनंद - विशेष