Get it on Google Play
Download on the App Store

श्रीआनंद - भूपाळी १

उठोनि ब्राम्हीं मुहूर्तीं । चिंतावी गुरुमूर्ती । संत हौनी संतीं । संत व्हावें ॥१॥
श्रीराम जयराम । जयराम राम राम । अखंड निजप्रेम रामरूपीं ॥घृ॥
असत निरसूनी । सद्‌गुरुबोध मनीं । मनातीतपणीं । राम व्हावें ॥२॥
बोधामृत सुख । निरसुनी महादु:ख । सद्‌गुरू कृपा ऐक्य । नित्य व्हावें ॥३॥
मायामृगजळ नाहीं नाहीं केवळ । मायाविद्या जाळ । वृथा जेथें ॥४॥
सत्यज्ञानरूप । आनंदें अमूप । श्रीरामीं तद्रूप । सहज व्हावें ॥५॥
होणें जाणें नाहीं । नाहीं भोक्त भोगणें । स्वदेहजग - जाणे । फल्गु झालें ॥६॥
सद्‌गुरु कृपाबोधें । स्वानंदें निजछंदीं । आनंद रामपदीं । मुक्त झाला ॥७॥


॥ श्रीरामजय० ॥घृ०॥

श्रीआनंद - चरितामृत

भगवान दादा
Chapters
श्रीआनंद - अध्याय पहिला श्रीआनंद - अध्याय दुसरा श्रीआनंद - अध्याय तिसरा श्रीआनंद - अध्याय चवथा श्रीआनंद - अध्याय पांचवा श्रीआनंद - अध्याय सहावा श्रीआनंद - अध्याय सातवा श्रीआनंद - अध्याय आठवा श्रीआनंद - अध्याय नववा श्रीआनंद - अध्याय दहावा श्रीआनंद - अध्याय अकरावा श्रीआनंद - अध्याय बारावा श्रीआनंद - अध्याय तेरावा श्रीआनंद - अध्याय चवदावा श्रीआनंद - अध्याय पंधरावा श्रीआनंद - अध्याय सोळावा श्रीआनंद - ओव्या श्रीआनंद - निर्याणाचे श्लोक श्रीआनंद - पद १ श्रीआनंद - पद २ श्रीआनंद - अभंग श्रीआनंद - भूपाळी १ श्रीआनंद - भूपाळी २ श्रीआनंद - भूपाळी ३ श्रीआनंद - भूपाळी ४ श्रीआनंद - भूपाळी ५ श्रीआनंद - भूपाळी ६ श्रीआनंद - स्फुट पदे श्रीआनंद - विशेष