Get it on Google Play
Download on the App Store

दत्ताची आरती - आरती ओवाळूं श्रीगुरू त्रै...

आरती ओवाळूं श्रीगुरू त्रैमूर्तीरुपा ।

सद्‌भावें पूजिता पावसि वारुनि ह्रत्तापा ॥ धृ. ॥

स्वरुप गुरुचें वर्णन करण्या मति नाही मजला ।

पाय तुमचे श्रीगुरुदत्ता लाजविती कमळ ॥

वर्तुळ गुल्फ सुंदर रम्य दिसती नेत्राला ।

कटिस्थित ती कौपिन शोभे अघटित गुरुलीला ॥ १ ॥

अरुणोदय सम छटि शोभवी श्रीगुरुमूर्तीला ।

हीच प्रसवली मिष्ट अन्न बहु कौतुक सर्वाला ॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रही तुष्टविलें त्याला ।

अतृप्त ऎसा कोणी प्राणी ग्रामिं नाहीं उरला ॥ २ ॥

दंडकमंडलु शंख चक्र आणि पद्म गदा हस्तीं ।

जटा मुकुट मस्तकीं कंठीं माळा शोभती ।

कुंदरदन हे बिंब फळासम ओष्ठ विलसती ।

ऎसीं श्रीगुरू त्रैमूर्ती अति सुंदर मूर्ती ॥ ३ ॥

नवस करुनी धनकरि वेगें उदिमाप्रति गेला ।

तव कृपेनें उदीम वाढुनि लाभ तया झाला ॥

परतुनि येता द्रव्याशेने तस्करिं वधियेला ।

संकट जाणुनि वधुनि तस्करां उठवीलें त्याला ॥ ४ ॥

अन्न भक्षितां विप्रापोटी चाळविला शूळ । दु:खें तळमळ करुनि प्राणत्याग दुर्बळ ॥

आपण जवळी आणविसी तूं द्रवुनी दयाळ ।

अन्नचि औषध देउनि शूळा हरिही तत्काळ ॥ ५ ॥

संततिसाठी वंध्या नारी प्रार्थितसे तुजला ।

कन्या पुत्र देउनि तींतें हरिसी दु:खाला ॥

श्वेत कुष्ठि तो ब्राह्मण धांवत स्वामींपुढें आला ॥

शुष्क काष्टाद्रुम निर्मुनि निर्मळ करिसी तयाला ॥ ६ ॥

कोल्हापुरिंचा द्विज पुत्र तो अज्ञ अपवित्र ।

जिव्हा छेदुनि भुवनेश्वरिसी स्तवित अहोरात्र ॥

चौदा विद्या देउनि त्यातें करिसी सुपतित्र ।

त्रैमूर्तीचा महिमा अपार अघटित गुरुसूत्र ॥ ७ ॥

त्रिविक्रमानें दांभिक म्हणुनि केली तव निंदा ।

विश्वरुप या दाउनि गर्व हरिला गोविंदा ॥

पतितामुखिं तूं सामर्थ्याने बोलविशी वेदा ।

वांझ महिषिला दोहुनियां तू प्राशियले दुग्धा ॥ ८ ॥

दिपवाळीचे दिवशीं स्वामी अष्टरुप होसी ।

अष्टगृहांसी जाउनि प्रेमें भिक्षा तूं घेशी ॥

गाणगापुरिंच्या शुद्रे स्तवितां प्रसन्न तूं होशी ।

शेती त्याच्या सहस्त्रपटिने धान्यपीक देशी ॥ ९ ॥

ऎसा अपार गुरुमहिमा हा वर्णु मी कैसा ।

भक्तरक्षणा अवतरलासी श्रीगुरु सर्वेशा ॥

नरहरि दत्ता स्वामी समर्था पावे जगदीशा ।

मोरेश्वरसुत वासुदेव दिन तारी या दासा ॥ आरती ओवाळूं. ॥ १० ॥

दत्त आरती संग्रह

भगवान दादा
Chapters
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती जय देव जय देव दत्ता अवधूत... दत्त आरती - जय देव जय देव जयगुरु माणि... दत्त आरती - जयदेव जयदेव जय श्रीस्वामि... दत्त आरती - करितों प्रेमें तुज नीरांज... दत्त आरती - जय जय श्रीअनसूयात्मज अवधू... दत्त आरती - जयदेव जयदेव जय त्रिगुणात्... दत्त आरती - जयदेव जयदेव अत्री ऋषिवर्य... दत्त आरती - जयदेवी, जयदेवी, जय देववंद... दत्त आरती - जय जय श्रीगुरु श्रीपाद दत... दत्त आरती - मंगलारती करूं श्रीगुरुदत्... दत्त आरती - आरती अवधूता । जय जय आरती ... दत्त आरती - ओंवाळूं आरती ॥ गुरूसी ॥ ओ... दत्त आरती - सहज स्थितीची आरती दत्ता न... दत्त आरती - पंचारति ओंवाळूं ॥ नित्य स... दत्त आरती - आरती ओवाळूं अनसूया । तनय ... दत्त आरती - श्रीगुरु दत्तराजमूर्ति । ... दत्त आरती - अनसूयानंदना तुज ओवाळूं आर... दत्त आरती - आर्ते आरती दत्त वोवाळूं ज... दत्त आरती - स्वानंदें आरती दत्ता पाहू... दत्त आरती - विडा घ्याहो सद्‌गुरुराया ... दत्त आरती - श्रीपादश्रीवल्लभ नरहरी ता... दत्त आरती - आतां स्वामी सुखें निद्रा ... दत्त आरती - नृसिंह सरस्वती-मनीं धरूनी... आरती दत्ताची - जयदेव जयदेव जयजी अवधूता ॥... शेजारती अवधूताची - सुखिं निद्रा करी आतां स्व... काकड आरती दत्ताची - काकड आरती स्वामी श्रीगुरु... आरती दत्ताची - जयदेव जयदेव जय दत्तात्रया... दत्त आरती - विधिहरिहर सुंदर दिगंबर झा... दत्ताची आरती - कृष्णापंचगंगासंगम निजस्था... दत्ताची आरती - आरती दत्तात्रयप्रभूची । ... दत्ताची आरती - जय देवा दत्तराया । स्वामी... दत्ताची आरती - दत्तात्रय अवधूत जनार्दन स... दत्ताची आरती - त्रिगुणात्मक त्रैमूर्ती ... दत्ताची आरती - आरती दत्तराजगुरुची । भव... दत्ताची आरती - सुखसहिता दु :खरहिता निर्म... दत्ताची आरती - जय जय दत्त दिगंबर अत्रिऋष... दत्ताची आरती - जय जय दत्त दिगंबर अत्रिऋष... दत्ताची आरती - देहत्रय अवतारा तापत्रय हर... दत्ताची आरती - धन्य हे प्रदक्षीणा सदग... दत्ताची आरती - पतिव्रता सती अनुसया माता ... दत्ताची आरती - श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि त... दत्ताची आरती - जो जो जो रे श्री आरती दत्... दत्ताची आरती - स्वामी नरसिंहसरस्वती । जय... दत्ताची आरती - नृसिंहसरस्वती । मनि धरुनि... दत्ताची आरती - आरती दत्तराजयांची । अनु... दत्ताची आरती - आतां स्वामी सुखे निद्रा क... दत्ताची आरती - विडा घेई नरहरिराया । धरू... दत्ताची आरती - अनुसूयासुत , दत्तदिगंबर त... दत्ताची आरती - आरती आरती दत्त ओंवाळू दात... दत्ताची आरती - जयजयजी दत्तराज भॊ दिगं... दत्ताची आरती - जय देव जय देव जय अवधूता ।... दत्ताची आरती - जयजयजी श्रीदत्तराज ही पंच... दत्ताची आरती - जय श्रीदत्ता आरती तुजला क... दत्ताची आरती - आरती ओवाळूं श्रीगुरू त्रै... दत्ताची आरती - आरती ओवाळीतो जय जय दिगंबर... दत्ताची आरती - दत्त दिगंबर त्रिमूर्ति सु... दत्ताची आरती - जय देवा दत्तराया । स्वामी... दत्ताची आरती - ओवाळूं आरती श्रीगुरुराज स... दत्ताची आरती - आरती ओवाळूं श्रीगुरु दत्त... दत्ताची आरती - येई बा नरहरीदत्ता गाणगापु... दत्ताची आरती - जयजय श्रीदत्तगुरू आरती तु... दत्ताची आरती - जय जय श्रीअनसूयात्मज अवधू...