Android app on Google Play

 

दत्ताची आरती - आरती दत्तात्रयप्रभूची । ...

 

आरती दत्तात्रयप्रभूची ।

करावी सद्‌भावें त्याची ॥ धृ. ॥

श्रीपदकमला लाजविती ।

वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥

कटिस्थित कौपिन ती वरती ।

छोटी अरुणोदय वरि ती ॥ चाल ॥

वर्णूं काय तिची लीला ।

हीच प्रसवली, मिष्टान्न बहु, तुष्टचि झाले,

ब्रह्मक्षेत्र आणि वैष्य शुद्रही सेवुनियां जीची ॥

अभिरूची सेवुनियां ॥ १ ॥

गुरुवर सुंदर जगजेठी ।

ज्याचें ब्रह्मांडे पोटीं ।

माळा सुविलंबित कंठी ।

बिंबफळ रम्य वर्णूं ओष्ठी ॥ चाल ॥

अहा ती कुंदरदनशोभा ।

दंडकमंडलू, शंखचक्र करिं, गदापद्म धरि,

जटामुकुट परि, शोभतसे ज्याची ॥

मनोहर शोभतसे. ॥ २ ॥

रुचिरा सौम्य युग्मह्रष्टी ।

जिनें द्विज तारियला कुष्टी ॥

दरिद्रे ब्राह्मण बहु कष्टी ।

केला तिनेंच संतुष्टी ॥ चाल. ॥

दयाळा किती म्हणूनि वर्णू ।

वंध्या वृंदा, तिची सुश्रद्धा, पाडुनि बिबुधची,

पुत्ररत्न जिस देउनिया सतिची ॥

इच्छा पुरविली मनिंची ॥ ३ ॥

देवा अघटित तव लीला ॥

रजकही चक्रवर्ती केला ॥

दावुन विश्वरुप मुनिला ।

द्विजादरशूल पळें हरिंला ॥ चाल. ॥

दुभविला वांझ महिषी एक ।

निमिषामाजी, श्रीशैल्याला तंतुक नेला,

पतिताकरवी, वेद वदविला, महिमा अशी ज्याची ॥

स्मराही महिमा. ॥ ४ ॥

ओळखुनि क्षुद्रभाव चित्ती ।

दिधलें पीक अमित शेती ॥

भूसर एक शुष्क वृत्ती ॥

क्षणार्धे धनद तया करिती ॥ चाल. ॥

ज्याची अतुल असे करणी ।

नयन झांकुनी, सर्वे उघडितां नेला काशिस,

भक्त पाहातां वार्ता अशि ज्याची ॥

स्मरा हो वार्ता अशि ज्याची ॥ ५ ॥

दयाकुल औदुंबरि मुर्ती ।

नमितां होय शांतवृत्ती ॥

न देती जननमरण पुढती ।

सत्य हे न धर मनि भ्रांति ॥ चाल ॥

सनातन सर्वसाक्षी ऎसा ।

दुस्तर हा भव, निस्तरावया, जाउनि स्त्वर,

आम्ही सविस्तर, पूजा करुं त्याची ॥

चला हो पूजा करुं त्याची ॥ ६ ॥

तल्लिन होउनि गुरुचरणीं ।

जोडुनि भक्तराजपाणी ॥

मागे हेंचि जनकजननी ।

अंती ठाव देऊ चरणीं ॥ चाल. ॥

नको मज दुजे आणिक कांही ।

भक्तवत्सला, दीनदयाळा, परम कृपाळा, दास नित्य याची ॥

उपेक्षा करूं नको साची ॥ ७ ॥

 

दत्त आरती संग्रह

भगवान दादा
Chapters
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती
जय देव जय देव दत्ता अवधूत...
दत्त आरती - जय देव जय देव जयगुरु माणि...
दत्त आरती - जयदेव जयदेव जय श्रीस्वामि...
दत्त आरती - करितों प्रेमें तुज नीरांज...
दत्त आरती - जय जय श्रीअनसूयात्मज अवधू...
दत्त आरती - जयदेव जयदेव जय त्रिगुणात्...
दत्त आरती - जयदेव जयदेव अत्री ऋषिवर्य...
दत्त आरती - जयदेवी, जयदेवी, जय देववंद...
दत्त आरती - जय जय श्रीगुरु श्रीपाद दत...
दत्त आरती - मंगलारती करूं श्रीगुरुदत्...
दत्त आरती - आरती अवधूता । जय जय आरती ...
दत्त आरती - ओंवाळूं आरती ॥ गुरूसी ॥ ओ...
दत्त आरती - सहज स्थितीची आरती दत्ता न...
दत्त आरती - पंचारति ओंवाळूं ॥ नित्य स...
दत्त आरती - आरती ओवाळूं अनसूया । तनय ...
दत्त आरती - श्रीगुरु दत्तराजमूर्ति । ...
दत्त आरती - अनसूयानंदना तुज ओवाळूं आर...
दत्त आरती - आर्ते आरती दत्त वोवाळूं ज...
दत्त आरती - स्वानंदें आरती दत्ता पाहू...
दत्त आरती - विडा घ्याहो सद्‌गुरुराया ...
दत्त आरती - श्रीपादश्रीवल्लभ नरहरी ता...
दत्त आरती - आतां स्वामी सुखें निद्रा ...
दत्त आरती - नृसिंह सरस्वती-मनीं धरूनी...
आरती दत्ताची - जयदेव जयदेव जयजी अवधूता ॥...
शेजारती अवधूताची - सुखिं निद्रा करी आतां स्व...
काकड आरती दत्ताची - काकड आरती स्वामी श्रीगुरु...
आरती दत्ताची - जयदेव जयदेव जय दत्तात्रया...
दत्त आरती - विधिहरिहर सुंदर दिगंबर झा...
दत्ताची आरती - कृष्णापंचगंगासंगम निजस्था...
दत्ताची आरती - आरती दत्तात्रयप्रभूची । ...
दत्ताची आरती - जय देवा दत्तराया । स्वामी...
दत्ताची आरती - दत्तात्रय अवधूत जनार्दन स...
दत्ताची आरती - त्रिगुणात्मक त्रैमूर्ती ...
दत्ताची आरती - आरती दत्तराजगुरुची । भव...
दत्ताची आरती - सुखसहिता दु :खरहिता निर्म...
दत्ताची आरती - जय जय दत्त दिगंबर अत्रिऋष...
दत्ताची आरती - जय जय दत्त दिगंबर अत्रिऋष...
दत्ताची आरती - देहत्रय अवतारा तापत्रय हर...
दत्ताची आरती - धन्य हे प्रदक्षीणा सदग...
दत्ताची आरती - पतिव्रता सती अनुसया माता ...
दत्ताची आरती - श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि त...
दत्ताची आरती - जो जो जो रे श्री आरती दत्...
दत्ताची आरती - स्वामी नरसिंहसरस्वती । जय...
दत्ताची आरती - नृसिंहसरस्वती । मनि धरुनि...
दत्ताची आरती - आरती दत्तराजयांची । अनु...
दत्ताची आरती - आतां स्वामी सुखे निद्रा क...
दत्ताची आरती - विडा घेई नरहरिराया । धरू...
दत्ताची आरती - अनुसूयासुत , दत्तदिगंबर त...
दत्ताची आरती - आरती आरती दत्त ओंवाळू दात...
दत्ताची आरती - जयजयजी दत्तराज भॊ दिगं...
दत्ताची आरती - जय देव जय देव जय अवधूता ।...
दत्ताची आरती - जयजयजी श्रीदत्तराज ही पंच...
दत्ताची आरती - जय श्रीदत्ता आरती तुजला क...
दत्ताची आरती - आरती ओवाळूं श्रीगुरू त्रै...
दत्ताची आरती - आरती ओवाळीतो जय जय दिगंबर...
दत्ताची आरती - दत्त दिगंबर त्रिमूर्ति सु...
दत्ताची आरती - जय देवा दत्तराया । स्वामी...
दत्ताची आरती - ओवाळूं आरती श्रीगुरुराज स...
दत्ताची आरती - आरती ओवाळूं श्रीगुरु दत्त...
दत्ताची आरती - येई बा नरहरीदत्ता गाणगापु...
दत्ताची आरती - जयजय श्रीदत्तगुरू आरती तु...
दत्ताची आरती - जय जय श्रीअनसूयात्मज अवधू...