Get it on Google Play
Download on the App Store

रंभा


रंभा ही इंद्राच्या दरबारातील एक प्रमुख अप्सरा होती. एक रंभा समुद्रामंथनाच्या वेळी प्रकट झाली होती आणि दुसरी कश्यप व प्रादा यांची कन्या होती. इंद्राने राज्यसभेसाठी रंभाला देवदेवतांकडून प्राप्त केले होते. रंभा ही तिन्ही जगात  तिच्या रूप आणि सुंदरतेसाठी प्रसिद्ध होती.

महाभारतामध्ये, ती तुरुंब नावाच्या गंधर्वाची बायको असे म्हटले आहे. अर्जुनाच्या स्वागतासाठी रंभेने स्वर्गात नृत्य केले होते.

रामायणातील संदर्भाप्रमाणे ती कुबेराचा पुत्र नलकुबेर याची पत्नी होती. रावणाने तिचे अपहरण करून तिच्यावर बळजबरी केली. यावर रूष्ट होऊन नलकुबेराने रावणाला शाप दिला की 'यापुढे जर त्याने एखाद्या स्त्रीशी तिच्या इच्छेविरूद्ध संबंध ठेवला तर त्याच्या डोक्याचे सात तुकडे होऊन त्याला मरण येईल.' यामुळेच रावणाच्या ताब्यातील सीता सुखरुप राहिल्याचे सांगितले जाते.