Android app on Google Play

 

अप्सरांची नावे

 

पुराणकथा व नाट्य शास्त्राच्या आधारे काही अप्सरांची नावे दिली आहेत -

अजगंधा, अनपाया, अद्रिका, अनवद्या, अनुचना, अंबिका, अरुणा, अरूपा, अलंबुषा, अल्मविशा, असिता, असिपर्णिनी, असुरा, आलंबा, उत्कचोत्कृष्टा, उमलोचा, उर्वशी, ऋतुस्थला, कपिला, कर्णिका, काम्या, केशिनी, गुणमुख्या, गुणवरा, घृताची, चारुनेत्री, चित्रलेखा, तिलोत्तमा, देवी, नागदंता, निर्ऋता, पंचचूडा, पुंजिकस्थला, पुंडरीका, पूर्वचित्ती, पौलोमी, प्रभावती(ऊर्फ स्वयंप्रभा), बुदबुदा, भासी, मनु, मनोभवा, मनोरमा, महाभागा, मारीचि, मार्गणप्रिया, मेनका, मिश्रकेशी, मिश्रस्थला, मंजुघोषा, रंभा, रक्षिता, रितुशाला, लता, लक्ष्मणा, वपु, वरंवरा, वर्गा, वंशा, विद्युता, विद्युत्पर्णा, विद्युत्प्रभा, विमनुष्या, विश्वची, शरद्वती, शिवा, शुचिका, शुचिस्मिता, शुची, समिची, सहजन्या(सहजिन्यु), सुगंधा, सुदती, सुप्रिया, सुबाहु, सुभगा, सुरजा, सुरता, सुरसा, सुलोचना, सोमा, सौदामिनी, सौरभेदी, स्वयंप्रभा (ऊर्फ प्रभावती), स्वर्णा, हासिनी, हिमा, हेमा, क्षेमा, वगैरे. या खेरीजही इतर अनेक अप्सरांचा उल्लेख हिंदू पुराणांमध्ये दिसून येतो.

इंद्राच्या दरबारात २६ अप्सरा होत्या. त्यापैकी उर्वशी, मेनका, रंभा व तिलोत्तमा या नृत्य-संगीत कलांत विशेष पारंगत होत्या. या अप्सरांना आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करण्याची विद्या अवगत असल्याचेही सांगितले जाते.

इंद्राच्या दरबारात स्थान न दिलेल्या काही अप्सरांना वनदेवीच्या वा जलकन्यांच्या स्वरूपांत पुराण कथेत स्थान मिळाले आहे. उदा. रामायणातील किष्किंधा कांडात 'हेमा' नावाच्या वनातील अप्सरेचा संदर्भ सापडतो.

रामायण, महाभारत, भागवत पुराण, वेद या सर्वांत अप्सरांचे उल्लेख व अनेक कथा आढळतात. कालिदासाच्या विक्रमोर्वशीय या नाटकाची नायिका उर्वशी आहे.

भारताबाहेर आग्नेय आशियातील अनेक कथांमध्ये व विशेषत: आंग्कोर वाट मंदिराच्या कलाकुसरीत व कोरीव कामात या अप्सरा आढळतात. हिंदू पुराणकथांव्यतिरिक्त बौद्ध, ग्रीक, रोमन आणि नॉर्डिक पुराणांतही अप्सरांचा उल्लेख आढळतो. त्या कथांनुसारही मर्त्य मानवांना किंवा देवांना वश करण्याचे कार्य अप्सरा करत.

आंग्कोर वाट मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या अप्सरा