Get it on Google Play
Download on the App Store

कंबोडियातील अप्सरा

राजकन्या भोपादेवी अप्सरा नृत्य करताना

कंबोडियाच्या संस्कृतीवर हिंदू आणि बौद्ध धर्माचा पगडा असल्याने हिंदू देव-देवता तसेच गंधर्व, अप्सरा यांना कंबोडियाच्या संस्कृतीत एक वेगळे स्थान मिळाले आहे.

आंग्कोर वाट अप्सरा
नृत्य व वादन करणार्‍या अनेक अप्सरा आंग्कोर वाटच्या मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या आढळतात. मंदिरातील देव देवतांना प्रसन्न राखण्यासाठी अप्सरांचे कोरीव काम करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

अप्सरा नृत्य
ख्मेर राज्यकाळापासून कंबोडियात अप्सरा नृत्य करण्याची प्रथा आहे. पूर्वी मंदिरात देवतांना प्रसन्न करण्याकरता हे अभिजात नृत्य केले जात असे. आज या नृत्याला कंबोडियाच्या पारंपरिक नृत्याचा दर्जा आहे. बरेचदा हे नृत्य, नृत्यनाट्य म्हणून सादर केले जाते. यक्ष, किन्नर, अप्सरा, गरुड, ऋषी अशा अनेक भूमिका या नृत्यांतून फुलवल्या जातात.

रेशमी वस्त्रे, आभूषणे, नाजूक पदन्यास व नृत्यमुद्रांद्वारे केल्या जाणार्‍या या नृत्यांत आंग्कोर वाटच्या मंदिरातील भिंतींवर कोरलेल्या अप्सरांचे दर्शन होते.