Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय अठ्ठेचाळीसावा

जो हो वेदां अगोचर । तो भक्तां हो सुगोचर । तया ग्रामीं भक्त शूद्र । नमस्कार करी नित्य ॥१॥

गुरुदेव संगमीं जाती । त्या पाहून करी प्रणती । पुनः ये तो येणें रीती । करी भक्ती शेतीकरितां ॥२॥

लोकी चमत्कार करावया । शूद्रा वदे गुरुराया । कच्चें पीका हें कापुनियां । टांकी मध्यान्हापावेतों ॥३॥

तो तें प्रमाण मानून । स्वामिमागा ठरवून । कापी, तत्स्त्री येऊन । करी विघ्न तरी न हटे ॥४॥

ते कथिती अधिकार्‍यासी । शूद्र न जुमानीं त्यासी । दावी मध्यान्हीं गुरुसीं । म्हणे शेतासी कापिलें

तूं अतःपर काय खासी । असें गुंरु पुसे त्यासी । म्हणे तुझ्या प्रसादेसी । लाभ आम्हासी होईल ॥

त्याचे पुरवाया हेत । वृष्टी मूलर्क्षी पाडित । शतगुण त्या शेतांत । गुरुनाथ धान्य देती ॥७॥

तो करुनि क्षेत्रपपूजा । सस्त्रीक करी गुरु पूजा । स्वामीभाग देउनि द्विजां । धान्यपुंजा वाटी हर्षे ॥८॥

संतोषोनी गुरुमूर्ति । त्यांच्या वंशा गती देती । अशा लीला केल्या किती । त्यातें नेणती ब्रह्मादिक ॥

इति श्री०प०प०वा०स०वि सारे शूद्रधान्यप्रवृद्धिवर्णनं नाम अष्टचत्वारिंशो०


सप्तशती गुरूचरित्र

संकलित
Chapters
अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणीसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठ्ठाविसावा अध्याय एकोणतिसावा अध्याय तिसावा अध्याय एकतिसावा अध्याय बत्तिसावा अध्याय तेहेतिसावा अध्याय चौतिसावा अध्याय पस्तीसावा अध्याय छत्तिसावा अध्याय सदतीसावा अध्याय अडतीसावा अध्याय एकोणचाळीसावा अध्याय चाळीसावा अध्याय एक्केचाळीसावा अध्याय बेचाळीसावा अध्याय त्रेचाळीसावा अध्याय चव्वेचाळीसावा अध्याय पंचेचाळीसावा अध्याय सेहेचाळीसावा अध्याय सत्तेचाळीसावा अध्याय अठ्ठेचाळीसावा अध्याय एकोणपन्नासावा अध्याय पन्नासावा अध्याय एक्कावन्नावा दत्तजन्म