Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय बाविसावा

गुरु वसे गाणगापुरीं । तेथें काय लीला करी । असें विप्रें पुसतां बरीं । लीला सारी सांगे सिद्ध ॥१॥

मी तो कः पदार्थ येथ । वर्णावया सर्व चरित । होती ब्रह्मादि कुंठित । तेव्हां संक्षिप्त सांगतों ॥२॥

अमेय कीर्ति गुरु आले । भीमामरजासंगमीं भले । गाणगापुरी राहिले । बैसले अश्वत्थीं तें ॥३॥

हो यद्गत्या गृह पावन । तो विप्रगृहीं येऊन । वांझमहिषी पाहून । ब्राह्मणस्त्रीतें बोले ॥४॥

सु सत्वा तूं दे क्षीरपान । ब्राह्मणी बोले वचन । वांझ म्हैंस हे दुभे न । गुरु दोहून दावीं म्हणे ॥५॥

मानून ती दोही क्षीर । दोन धडे दोहिलें क्षीर । गुरु पिऊनीं देती वर । हो दारिद्र दूर म्हणूनी ॥६॥

इति श्री०प०प०वा०स०वि० सारे वंध्यामहिषीदोहनं नाम द्वाविंशो०


सप्तशती गुरूचरित्र

संकलित
Chapters
अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणीसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठ्ठाविसावा अध्याय एकोणतिसावा अध्याय तिसावा अध्याय एकतिसावा अध्याय बत्तिसावा अध्याय तेहेतिसावा अध्याय चौतिसावा अध्याय पस्तीसावा अध्याय छत्तिसावा अध्याय सदतीसावा अध्याय अडतीसावा अध्याय एकोणचाळीसावा अध्याय चाळीसावा अध्याय एक्केचाळीसावा अध्याय बेचाळीसावा अध्याय त्रेचाळीसावा अध्याय चव्वेचाळीसावा अध्याय पंचेचाळीसावा अध्याय सेहेचाळीसावा अध्याय सत्तेचाळीसावा अध्याय अठ्ठेचाळीसावा अध्याय एकोणपन्नासावा अध्याय पन्नासावा अध्याय एक्कावन्नावा दत्तजन्म