सिद्धेश्वर विलास पाटणकर
छकुल्या , रेघोट्या असाच ओढत जा
खाडाखोड तू करत जा
जीवनही असेच आहे
पण चुकीमागे शिकत जा II
लागू नको नादी कधी
दुसऱ्याला भलेही लागून दे
अन आली लहर कधी मधी
तर पोटात दोन घोट घे II
कर्माचे चित्र जर
असले विचित्र तर
मनाचेच ऐक तू
धर्मास न दे अंतर II
धर्म निंद्य मानला
वंद्य मग राही ते काय ?
धर्मासी आधी जाण तू
आत्म्याचे ते दोन पाय II
चूक जरी केली तरी
पुन्हा तीच करू नको
शिकुनी पुढे टाक पाय
सत्यास विस्मरू नको II
बाप वचन सांगतो
अनुभवांचे बोल हे
हळूहळू चालतो , आधी ऐकतो मग बोलतो
तो चुकूनही सुधारतो
हळू चाल, ऐक आधी
जिभेला लगाम दे
खोडताना विचार कर
घाई करू नको कधी II
छकुल्या , रेघोट्या असाच ओढत जा
खाडाखोड तू करत जा
जीवनही असेच आहे
पण चुकीमागे शिकत जा II
सिद्धेश्वर विलास पाटणकर