मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..
सुरुवातच कसली अफलातून
आहे. आपोआप कान
टवकारले जावेत, पुढचे शब्द
ऐकण्यासाठी....
पुढची ओळ तर अधिकच
सुंदर, 'काळजी' मिटवणारी;...
"हर फिक्र को धुऍं़ में
उडाता चला गया"..
म्हटलं तर किती साधे
शब्द. पण, सगळं टेन्शन
दूर करणारे...
साहिर लुधियानवी यांनी
अवघ्या आठ ओळींमध्ये
लिहलेलं हे नितांत सुंदर
गीत. दोन ओळी तर
ध्रुवपदातच संपतात...
पण, त्या ऐकताक्षणीच
नवचैतन्य फुलतं. एक
नवा आत्मविश्वास निर्माण
होतो. आयुष्याची सोबत
करत पुढे वाटचाल करत
राहणं. हेच तर नेहमी
करत असतो आपण...
अन् हे करत असतानाच
आपली सोबत करणाऱ्या
कथा-काळज्या हवेत
विरून गेल्या तर जीवन
सुकर होईलच...
आयुष्यांत येणाऱ्या दुःखांचा,
त्रासाचा शोक करत बसणं,
म्हणजे वेळ व्यर्थ वाया
घालवणं आहे, असं कवीला
वाटतं...
यावर त्यांनीच सांगितलेला
साधा उपाय...
"बरबादीयोंका जशन् मनांता
चला गया"... आयुष्यांत पदरी
पडणारा विध्वंसही celebrate
करत जगायचं....
कांय कमाल आहे नां, शब्दांची..
बरबादी आणि जशन् हे शब्द
एकत्र वापरतांना किती विसंगत
वाटू शकतात. पण, तेच इथं
किती चपखलपणे आयुष्यांतल्या
कठीण प्रसंगांवर मात करण्याचा
तोडगा सांगून जातात...
जे मिळालं तेच आपलं भाग्य
आहे. पण, जे हातून निसटत गेलं
त्याला विसरून जात, पुढे
वाटचाल करावी. हे आयुष्यांत
जमलं पाहिजे हेच खरं....!!
"जो मिल गया उसी को
मुकद्दर समझ लिया...
जो खो गया मैं उस को
भूलाता चला गया"...
या ओळींमधून हेच सांगायचा
प्रयत्न केलाय. इथेही साध्याच
शब्दांची मांडणी...
फक्त योग्यप्रकारे केलेली आणि
पुन्हा एकदा फार मोठा अर्थ
आपल्यासमोर ठेवणारी...
या छोट्याशा गीतामधली
सर्वाधिक संमोहीत करणारी
जादू आहे. अंतिम दोन
ओळींमध्ये....
"गम और खुशीमें फर्क ना
महसूस हो जहाँ...
मैं दिल को उस मकाम पे
लाता चला गया"...!!
सुख, दुःख सारखंच वाटावं,
त्यातला फरकच जाणवू नये,
अशी स्थिती प्रत्येकाच्या
आयुष्यांत एकदा तरी येतेच..
पण, मनांला अशा स्थितीत घेऊन
जाणं, जर स्वतःलाच जमू लागलं
तर... चिंता, भय, मोह असलं
कांहीच उरणार नाही. उरेल ते
केवळ जगणं...!!!
Source : unknown