Android app on Google Play

 

--गांधीला हसवलं कुणी?--

 

[4:14 AM, 11/7/2017] +91 83904 89378: खेड्यातल्या पाऊलवाटा

गांधीने दाखवल्या...

स्वतंत्र भारतातील शहरी

फांद्या वाकवल्या...

लाईफ हळूहळू चेंज झाली..

पारावरही मोबाईलला रेंज आली..

गावं डिजिटल झाली

रोजगार हमीतल्या पन्नाशीला लाचार

सुशिक्षित ससा...

मला कळत कसं नाही

पन्नासच्या नोटेवर गांधी

खळखळून हसतोच कसा?


बियांनावर बलात्कार

मंत्रिमंडळात चमत्कार

हर हर घर घर

अच्छे दिनाचे साक्षात्कार..

विदेशी दौरे साजरे..

मिडियालाच दिसतात विकासाची गाजरे..

इथे तर त्याचाही विनयभंग

आणि फांदीला लटकतात

मातीच्या कर्जाचे अभंग

अनुदानाच्या अर्जासाठी

शंभरावर अडतो विधवेच्या

अंगठ्याचा ठसा..

मला कळत नाही

शंभरच्या नोटेवर गांधी

खळखळून हसतोच कसा?


चारपदरी हायवे झाले..

रस्त्यांचे रन वे झाले..

एकदाच फक्त खरं बोल

कुठंवर घेत राहणार टोल?

कुणी मतांसाठी विरोध

मनसे केला गेला...

मनातला राग आम्ही

मनामध्येच पेरून घेतला..

प्रवास सुखाचा होवो

म्हणून स्वागत करतो

पांढरा तांबडा रस्सा...

या रस्यावरही जी.एस.टी.

लागली भाऊ….

पाचश्यांनं खाली होतो खिसा...

मला कळत कसं नाही

पाचशेच्या नोटेवर गांधी

खळखळून हसतोच कसा?


आजारी बापाच्या

औषधाच्या चिठ्ठीच्या मागील बाजूस

लेकरं हताश होऊन गणितं

सोडवतात तेव्हा,

बाप नाही हा देशच आजारी असतो....

अखेर शवघरातून बाप 

सोडवावा लागतो तेव्हा

हंबरडा हि फोडता येत नाही

स्वतंत्रपणे...

निपचित पडलेला बापच

दोन हजारात विकत 

घ्यावा लागतोच कसा?

मला कळत कसं नाही

दोन हजारावरचा गुलाबी गांधी

खळखळून हसतोच कसा?


या गांधीला हसवलं तरी कुणी?

कुणी केल्या गुदगुल्या...

बिचारा एवढा खळखळून

हसत नव्हता कधी...

हसत राहा गांधी असाच हसत राहा...

राशनच्या रांगेत उपाशी वादळं

उभी आहेत तोपर्यंत

असाच अगदी...

असाच खळखळून हसत राहा....गांधी....

तुला काळ्या पैशाएवढ्या माझ्या शुभेच्छा....

------------------------

दंगलकार -नितीन चंदनशिवे.

कवठेमहांकाळ

सांगली

8855800195.

[4:19 AM, 11/7/2017] +91 83904 89378: जग कसं अजब आहे !


देवावर प्रेम सर्वांनाच आहे.

...पण 'त्याच्या घरी' जायची 

घाई मात्र कुणालाच नाही.


आपल्या घरात सर्वांनाच देव हवा.

...पण त्याच्या घरी आपण जायच्या

विचाराने मात्र मनात धडकी भरते.


देव आपल्या घरी आला म्हणजे,

'सण, उत्सव आणि आनंद.'

आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे,

'दुःख, शोक.'


देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा.

आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणूनही आटापिटा.


देवाघरून येणं म्हणजे 'जन्म'.

देवाघरी जाणं म्हणजे 'मृत्यु'.


दोन्हीही अटळ आहेत.

पण ह्या दोघांमधली जी 'गंमत' आहे,

त्यालाच तर 'आयुष्य' असे नाव आहे.


                               - व. पु. काळे