Android app on Google Play

 

मशीन लर्निंग

 

मशीन लर्निंग हा AI चाच एक भाग आहे ज्यांत गणिती प्रक्रियेने संगणकाला शिकवले जाते. उदाहरण म्हणजे 

२,२ = ४ 

३,२ = ५ 

४,२ = ६ 

तर 

४,५ = ? 

इथे बहुतेक मानव ९ हे उत्तर अनुभवाने देतील पण संगणक सुद्धा वरील ३ उदाहरणे पाहून चौथ्या प्रश्नाचे उत्तर ९ म्हणून देऊ शकतो. अर्थांत संगणकाला लक्षावधी उदाहरणे द्यावी लागतात. मागील ५० वर्षांचा हवामानाचा डेटा पाहून आपण ह्या वर्षी हवामान कसे असेल हे संगणकाला विचारू शकतो. लक्षावधी कॅन्सर पेशेंट चा डेटा दाखवून एखाद्या कॅन्सर पेशंट च्या वाचण्याची शक्यता विचारू शकतो. 

मशीन लर्निंग हे आज काल संगणक क्षेत्रांतील सर्वांत प्रभावी तंत्रज्ञान आहे आणि इथे खूप पगाराच्या नोकऱ्या निर्माण होत आहेत.