Get it on Google Play
Download on the App Store

डीप लर्निंग

मागील काही वर्षांत संगणक, ऊर्जा इत्यादी गोष्टीचे दर इतके खाली गेले कि अचानक प्रचंड मोठी न्यूरल नेटवर्क निर्माण करणे साधे झाले. आजकाल अब्जावधी न्यूरॉन्स असलेले नेटवर्क आम्ही तयार करू शकतो. 

ह्या नवीन संशोधनाने आज काल अनेक अश्या गोष्टी आपण करू शकतो ज्या त्याआधी शक्य नव्हत्या. उदाहरणार्थ ड्रायवर शिवाय चालणारी गाडी जी गुगल, उबेर इत्यादींनी बनवली आहे. 

ह्या अश्या न्यूरल नेटवर्क ला जेंव्हा वापरले जाते तेंव्हा त्याला डीप लर्निंग असे म्हटले जाते. इथे एका मोठ्या प्रॉब्लेम ला छोट्या छोट्या भागांत विभागून समजून घेतले जाते. मानवी डोळा ज्या प्रकारे एक चित्र पाहून त्यातील गोष्टी ओळखू शकतो त्याच प्रकारे केमेरा मधून येणाऱ्या चित्रांना हे नेटवर्क समजून त्यानं नक्की काय आहे हे समजू शकतो. त्यामुळे एक गाडी चालका शिवाय रस्त्यावर चालू शकते आणि कुणी मध्ये आला तर ब्रेक सुद्धा लावू शकते.