Android app on Google Play

 

कृत्रिम बुद्धिमत्ता

 

माणसाप्रमाणे बुद्धी असलेले मशीन बनवणे हे माणसाचे एक स्वप्न आहे. त्यातूनच आजचे काम्पुटर इत्यादींचा जन्म झाला आहे. हल्ली AI ने फार प्रगती केली आहे असे वाचनात येते आणि सामान्य माणसाच्या मनात त्याबद्दल कुतूहल जागृत होते त्यासाठीच हे पुस्तक लिहिले आहे. 

मानवी बुद्धिमत्ता कशी काम करते ? 

मानवी मेंदूंत अब्जावधी न्यूरॉन असतात. एक न्यूरॉन म्हणजे एक छोटीशी पेशी असते. सर्व मानवी संवेदना, म्हणजे आपण डोळ्यांनी काही पहिले किंवा हात लावला इत्यादी मध्ये आपले अवयव विजेचे सिग्नल्स मेंदूत न्यूरॉन कडे पाठवतात. प्रत्येक प्रकार्याच्या सिग्नलला प्रत्येक न्यूरॉन वेगळया पद्धतीने प्रतिसाद देतो. शेवटी अब्जावधी न्यूरॉन्स अश्या प्रकारे प्रत्येक संवेदना हाताळतात आणि एक विशिष्ट प्रकारचे विजेचे सिग्नल इतर अवयवांना पाठवतात. त्यामुळे गरम लागले तर हात आपण चटकरून परत घेतो, एखादी प्रेक्षणीय गोष्ट पाहत राहतो इत्यादी. 

मानवी बुद्धी हि ह्याच न्यूरॉन मुळे निर्माण झाली आहे असेच एकमत आहे. 

जेंव्हा विज्ञानाने हा शोध लावला तेंव्हा माणसाने संगणक वापरून अश्या प्रकारचे न्यूरल नेटवर्क निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि लक्षांत आले कि खरोखरच त्यामुळे अनेक गोष्टी मानवी बुद्धिमत्ते प्रमाणेच केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ मानवी हस्ताक्षर ओळखणे हे काम सध्या संगणक न्यूरल नेटवर्क वापरूनच ओळखू शकतो. 


पण आमच्या मेंदूं अब्जावधी न्यूरॉन्स असतात पण आजकाल संगणक इतके प्रगत नाहीत त्यामुळे मानवी बुद्धीप्रमाणे बुद्धिमत्ता निर्माण करणे असं शक्य झाले नाही. त्याशिवाय मानवी मेंदू आपल्या आईवडिलांकडून जनुकीय दृष्ट्या अनेक ज्ञान मिळवतो जे ज्ञान मानवाने लक्षावधी पिढ्या द्वारे मिळवले आहे. हे सर्व काही संगणकाला आज सुद्धा शक्य नाही.