Android app on Google Play

 

आरोग्यम धनसंपदा

 

अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये 'आरोग्य' ही आणखी एक महत्त्वपूर्ण गरज निर्माण झाली आहे. आरोग्याशी सांधर्भात सेवांमध्ये औषधनिर्मिती आणि औषधपुरवठा या खूप महत्वपूर्ण असतात आणि या सेवा पूरवण्याचे काम फार्मासिस्ट करतो. आत्तापर्यंत तुमचा कधी न कधीतरी फार्मासिस्टशी संबंध आला असेलच आगदी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे खरेदी करण्यापासून ते शस्त्रक्रियेसठी लागणाऱ्या गराजाणपर्यंत...
डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधयोजनेनुसार (प्रिस्क्रिप्शन) नुसार औषध वितरित (डिस्पेन्स) कारण एवढीच काय ती लोकांना फार्मासिस्टची ओळख असते. दुसऱ्या शब्दात 'एक औषधवाला' अशीच प्रतिमा लओकांच्या मनात निर्माण होते. त्याच्या पलीकडेही फार्मासिस्टची अनेक कर्तव्ये, पैलू आहेत. फार्मासिस्टच्या आशा अनेक पैलूंबाबत आपल्या समाजामध्ये जागरूकता नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.
चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे फार्मासिस्ट आणि काय आहे त्याची भूमिका तुमच्या आरोग्यसंधार्भात...

१२ वी विज्ञान शाखेनंतर ज्या व्यक्तीने औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) मध्ये पदविका (डिप्लोमा D Pharm) अथवा पदवी (डिग्री B Pharm)पूर्ण केले आहे ती व्यक्ती फार्मासिस्ट असते. १२ वी नंतर डिप्लोमा २ वर्षांचा तर डिग्री ४ वर्षांची असते. पदवीनंतर M. Pharm, MBA, PhD आशा उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. याशिवाय १२ वी नंतर Pharam D डॉक्टरेट ऑफ फार्मसी हा ६ वर्षांचा अभ्यासक्रम आहे.
डॉक्टरांनी लिहून दिलेली औषध वितरित करण एवढीच काय ती आपल्याला फार्मासिस्टची ओळख आहे पण याशिवाय अनेक महत्वपूर्ण कामे फार्मासिस्ट करतो. आरोग्यविषयक अनेक सुविधा पुरावण्यामध्ये त्याची भूमिका अत्यंत महत्वपुर्ण असते.
औषधयोजना (प्रिस्क्रिप्शन) ची सत्यता आणि वैधात तपासण्याचे अधिकार फार्मासिस्टकडे असतात. औषधयोजनेमध्ये जर काही त्रुटी असेल तर त्यासंदर्भात तो डॉक्टरांशी चर्चा करून बदल सुचवू शकतो. औषधाची तपशीलवार माहिती, त्याकज शरीरावर होणार परिणाम, औषधाची परिणामकता (Potency),  औषधातील कार्यकारी तत्व (Active Pharmaceutical Ingredients API), औषधाचे दुष्परिणाम (Side Effect), औषधयोजनेची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन हे केवळ आणि केवळ फार्मासिस्टकडेच

औषधयोजनेची सत्यता आणि  वैधात पाहून औषधांचे वितरण करणे, वितरित केलेल्या औषधांची नोंद ठेवणे,औषधांच्या वापरासांधर्भात रुग्णांना मार्गदर्शन/समुपदेशन करणे, औषधांचा रुग्णांनाच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे, रुग्ण इतिहास (Petient History) नोंद करणे, औषधांची वैधता तपासणे, विविध प्रकारानुसार औषधांची मांडणी तसेच वर्गीकरण करणे, औषधसंशोधन काणे, आरोग्यासंधर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण कारणे, योग्य औषध योग्य वेळी योग्य ठिकाणी किमान नफा या तत्वावर रुग्णांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे,  नशा निर्माण करणाऱ्या तसेच घातक औषधांची (Narcotics and Harmful Drugs) ची कायदेशीर नियमानुसार वितरण करने आणि त्यांची नोंद ठेवणे ही सर्व फार्मासिस्टची कामे आहेत

फार्मासिस्ट हा तुमच्या आरोग्यासाठी सदैव तत्पर असतो. तुमचं आरोग्य हीच त्याच्यासाठी महत्वपूर्ण  बाब आहे. फार्मासिस्टशिवाय इतर कोणीही औषधवितरण करणे अथवा प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधवितरण करणे नियमबाह्य आहे. यामुळे उपचारामध्ये त्रुटी (error) येऊ शकतात.

तुमच्या आरोग्यसंदर्भात सर्व समस्यांबाबत तुम्ही फार्मासिस्टशी  मनमोकळेपणाने बोलू शकता. फार्मासिस्ट तुम्हला प्रिस्क्रिप्शनशिवय घेता येणारी औषधे (Over The Counter Drugs OTC Drugs) तसेच सौंदर्य प्रसादने (Cosmetics) खरेदी करण्यामध्ये योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करू शकतो. रक्तदाब (Blood Pressure BP) मोजणे, रक्तातील शर्करेचे (Sugar) प्रमाण मोजणे, वजन, उंची, BMI मोजणे तसेच प्रथमोपचाराच्या सर्व सेवा आणि सुविधा फार्मासिस्ट देऊ शकतो.

फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा (link) आहे. व्यस्त कामकाजामुळे डॉक्टर रुग्णांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत, डॉक्टरांकडून पुरेस मार्गदर्शन भेटत नाही परंतु फार्मासिस्टकडून तुमहाला औषधयोजनेसंधार्भात तज्ञ सल्ला  आणि मार्गदर्शन मिळू शकते. औषधयोजनेसंधार्भात तपशीलवार माहिती ही केवळ आणि केवळ फार्मासिस्टकडेच मिळू शकते.&

आजच्या ऑनलाइन युगात डिस्काउंटसाठी रुग्ण ऑनलाइन औषध खरेदी करतात परंतु रुग्णांनी हे लक्षात घ्यायला हवे की डिस्कोऊंटपेक्षाही आपलं आरोग्य महत्वपूर्ण आहे. आपत्कालीन स्थितीत  फक्त फार्मासिस्टच तुम्हाला औषधे उपलब्ध करून देऊ शकतो. याशिवाय रुग्ण समुपदेशन, औषधवापरासांधर्भात सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन हे केवळ फार्मासिस्टकडूनच मिळू शकते. आता तुम्हीच ठरवायचे आहे की तुम्ही औषधे ही एका कुरियर बॉय कडून घेणार की चार वर्षे शिक्षण घेतलेल्या फार्मसी सांधर्भात संपूर्ण ज्ञान असलेल्या वेल क्वालिफाइड फार्मासिस्टकडून निर्णय तुमचा आहे.

तुमच्या आरोग्यविषयक सर्व समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी फार्मासिस्ट सदैव तयार असतो गरज आहे ती तुम्ही पुढे येऊन त्याच्याशी मैत्रीचं नात निर्माण करण्याची!
तुमच्या आरोग्यविषयक सर्व समस्यांबाबत फार्मासिस्टकडून निःसंकोचपणे मार्गदर्शन आणि सल्ला घेऊ शकता.
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!

आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)
ashishkarle101@gmail.com
 

मराठी कथा नि गोष्टी

परम
Chapters
कुटुंब
सोहोराब काका
शाॅपींग फेस्टिव्हल...
मामा
गुरूमूर्ती यांचे नोटबंदीवरिल विचार अत्यंत सोप्या शब्दात
शंभू
तरुण रामस्वामी
चोरकाका...
#कुटुंब
प्रोजेक्टचे व्हॅल्यूएशन
सोबत
रसायन
साबून स्लो हैं क्या?
"या सूरांनो चंद्र व्हा...."
कोजागरी पौर्णिमा
दरमहा पैसे वाचविण्याच्या सात टिप्स...
जादूगर ची बायको
प्रेम
प्रेम आणि विश्वास
निरोगी राहण्याचे काही नियम
लेखन
संकष्टी महात्म्य
समाधान श्रीमंतीचं दुसरं नावं
मला वाटायच
गोष्टी परीक्षण करतानाच्या (supervisionच्या)
!! लेखन !!
अखेर श्रीखंडाच्या वड्यांची रेसिपी सापडली
गोष्टी परीक्षण करतानाच्या
लक्ष्मी
पंगिरा
मधुमालतीचा वेल
अप्रूप
मसालेभात
स्पर्श
अखेरचा डाव....
आजी
आईचा आत्मा
जड झालेले आई-बाप
दुर्दैवी मराठीची होरपळलेली पानं...
निरोप..
हुरहुर दिवाळीची....
कळीचा नारद
जन्याच पोर.
ऍपल
छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना माहिती नाही..
आरोग्यम धनसंपदा
श्रीमंत वृद्धाश्रम