गोष्टी परीक्षण करतानाच्या
सध्या सगळीकडे परीक्षेचा काळ आहे.त्यामुळे कोणत्याही वर्गावर सुपरविजन हे शिक्षकाच्या पेशातील खर तर बोअर काम भयंकर कंटाळवाणे.पण यातही काही गंमतीजंमती घड़तात. यावेळी मुलांचे चेहरे बरेच काही बोलत असतात.त्यातील काही गंमतीजंमती.
काहीजण आठवण्यासाठी वर छताकडे बघत असतात,तर काही शुन्यात नजर.काहीना उत्तर आठवल्याचा आनंद तर काही आठवत नाही म्हणून अस्वस्थ. काही पहिल्या प्रश्नापासून प्रश्नार्थक चेहरे केलेले.तर काहीना काहीही येत नाही हे कळत तर काही गोंधळलेले चेहरे. काही निराशेने भरलेले,काही मिश्किल, आम्हा शिक्षकाचा डोळा चुकवून पुढच्याला विचारणारे, काही नुसते बाहेर कोण येत जाते बघणारे.
हल्ली बघुन लिहण्यात मुलीही मागे नसतात तोंडाला हात लावून बोलणे,उंच होवून पुढचीचा पेपर बघणे,प्रश्पत्रिकेवर वर जोड्या,रिकाम्याजागा,चूक बरोबर लिहणे. तो शिक्षकाचा डोळा चुकवून पास करणे.एखादी सूचना वर्गात आली की त्यात शिक्षक गुंतलेले पाहुन पटापट एकमेकाला विचारण्याचे कौशल्य तर वाखाण्यासारखे
जी मुले अप्रगत चेहरे तर इतके मजेशीर त्यांना ह्या सगळ्यांतुन कधी सुटका होते असे झालेले.मग पाणी प्यायला, लघवीला जावून वेळ काढायचा. सारखे किती वाजले, पेपर कधी घेणार विचारायचे.उगाचच काही तरी आठवतोय असे भासवायचे डोंबले सगळा पेपर कोरा काही येत नाही म्हणून प्रश्नपत्रिका उतरवायची मग कोणी काही दुसऱ्याला सांगत असेल तर तेवढेच ऐकून लिहायचे. पुन्हा कोणाची तरी वाट बघायची.
काही so called हुशारांचा अभिनिवेश पाहण्यासारखा असतो.सारखे आपण काहीतरी आठवतोय असे भाव चेहऱ्यावर. जरा शिक्षकांची पाठ वळली की शेजारीपाजारी विचारायचे न तोंडावर भाव तर इतके साळसुद की आपण त्या गावचेच नाही. जणु आम्हाला काही कळत नाही ह्यांनी काय केले ते. काही बघुन आक्रस्तालळेपणा करणार मी नाहीच बोललो बघितले म्हणून आरडाओरडा करणारे. उगाच सज्जन चेहरा न काम दुर्जनाचे.
अति हुशारांची बातच और पेपर कधी वाटतात कधी पाहतोय न कधी सोडवतोय असे अस्वस्थ. त्यांना वाटत असते प्रश्नपत्रिका मला अगोदर द्यावी न सगळ्यात शेवटी काढून घ्यावी. सतत छपराला नाही तर भिंतीकडे नजर.मुलगा असेल तर थोड़ी इतरांना मदत,पण स्वताचे झाल्यावर मुलगी असेल तर शक्यतो नाही सांगत. 4 वेळा कोणी बोलावले तर एकदा त्रासिक नजरने पाहणार की विचारणाऱ्याला आपल काही चुकल वाटावे.ह्यांना वेळ पुरत नाही.कितीही लिहले तरी अजुन लिहायचे असते. पुरवण्या जोडणे, त्यावर नंबर लिहणे त्यांना अतिशय फ़ालतू वाटते. त्यात वेळ घालवणे त्यांना पसन्त नसते. डोक्यात भरलेले सगळे कधी एकदा पेपरात ओततो न काय नाही आले काय चूक बरोबर चेक करणे हे आवडते काम. आपल्याला नाही आले न दूसऱ्याला आले की यांना टेंशन येते.बाहेर आले की लगेच गाइड काढून बघणारे,काय चूक बरोबर. स्वतला एखादे येत नसेल तर मग मी तुला सांगते तू मला सांग असे डील करणारे. परिक्षेचे टेंशन ह्यांच्या चेहऱ्यावर जणु ही आयुष्यातील शेवटची परीक्षा.
काही 11 च्या पेपरला 10 पासून येणारे तर काही साडे अकराला रमतगमत. काही अगदी सुवाच्य लिहणार काही, गिचमिड काही .नाव नंबर न टाकता लिहायला सुरु तर काही त्यातच वेळ घालवणारे.काही नुसते कोण काय सांगते हे बघत बसणारे तर काही 3 तासात एकदाही मान वर न करणारे. काहीना वेळ कसा पूरेल ही धास्ती तर काहीना एवढ्या वेळेचे करायचे काय हा प्रश्न
ह्या साऱ्यांचे चेहरे पाहुन खूप हसायला येते. कधी राग येतो. पण यात बोअर supervision सुसह्य होते हे खर!
ज्योतिमिलिंद