Android app on Google Play

 

शांतिकर्मे

 

या वर्गातील मंत्रांमागे दुःखनाश आणि पापरिमार्जन ही प्रेरणा आहे. 

दु:खस्वप्ने, अपशकुन, पापनक्षत्रावर झालेला जन्म, कपोत आणि घुबड यांसारख्या अशुभ पक्ष्यांचे दर्शन इत्यादींमधून होणारी दुःखे टळावीत म्हणून शांतिकर्मे सांगितली आहेत.

कळत-नकळत झालेल्या पापांसाठीही शांतिकर्मे आहेत. उदा., कर्जफेड विशेषतः जुगारात झालेल्या कर्जाची फेड न करणे ,थोरल्या भावाच्या आधी विवाह करणे, धर्मकृत्यांत काही चूक होणे  इ. पापे. 

पापाला सहस्त्राक्ष म्हटले असून पापी मनुष्य राक्षसाने झपाटलेला असतो अशीही कल्पना दिसते. 

अथर्ववेदाच्या चौथ्या कांडातील २३ ते २९ या मृगारसूक्तांचा अंतर्भावही याच वर्गात करता येईल. त्यांत दुःखनाशासाठी अग्नी, इंद्र, वायू आणि सविता, द्यावा-पृथिवी, मरूत, भव आणि शर्व, मित्र आणि वरूण या देवतांच्या प्रार्थना सांगितलेल्या आहेत.