अथर्ववेदाच्या शाखा
अथर्ववेदाच्या नऊ शाखा उल्लेखिल्या जातात त्या अशा पैप्पलाद, तौद किंवा तौदायन, मौद किंवा मौदायन, शौनक, जाजल, जलद, ब्रह्मवद, देवदर्श, चारणवैद्य! या शाखांपैकी पैप्पलाद
आणि शौनक या दोन शाखांच्या संहिताच आज उपलब्ध आहेत.
पैप्पलाद हे नाव पिप्पलाद नामक ऋषीच्या नावावरून आले आहे. पैप्पलाद शाखेचा प्रवर्तक हाच असावा. पैप्पलाद शाखेच्याअथर्ववेदसंहितेत एकूण वीस कांडे आहेत. ‘शं नो देवी:...’ या मंत्राने या संहितेचा प्रारंभ होतो. सत्तर वर्षांपूर्वी पैप्पलाद संहितेची एक प्रत काश्मीरमध्ये उपलब्ध झाली. ब्लूमफील्ड आणि आर्. गार्बे यांनी या संहितेच्या हस्तलिखिताचे संपादन केले आहे.